Manoj Jarange Patil : कोर्टाने काल दिलेल्या आदेशांवर आज मनोज जरांगेंचे वकील म्हणाले की…
Manoj Jarange Patil : आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत. 5 हजारपेक्षा जास्त लोक येऊ नये ही आयोजक आंदोलकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं.

मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. काल या आंदोलनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने काही महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आज 2 सप्टेंबर दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा, आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका तसेच हे आंदोलक आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील इतर भागात फिरत असतील तर त्यांना बाहेर काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. काल कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी आंदोलनाच्या विरोधात असणारे वकील गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्त्यांनी आंदोलकांकडून नियमांचं कसं उल्लंघन झालं? त्याची माहिती दिली.
काल कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने काही मुद्यांवरुन आंदोलकांना फटकारलं. आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत. 5 हजारपेक्षा जास्त लोक येऊ नये ही आयोजक आंदोलकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं. तसेच आमरण उपोषणाला परवानगी नव्हती, पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असंही कोर्टाने म्हटलं.
‘एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी चालू शकत नाहीत’
आज मनोज जरांगे पाटील यांचे वकील मीडियाशी बोलले आहेत. “घटनादत्त अधिकार आंदोलन करण्यासाठी देऊ शकता, मोर्चे काढण्यासाठी परवानगी देऊ शकता. सभा भरवण्यासाठी परवानगी देऊ शकता. मग, आंदोलन जर आमरण उपोषण असेल तर ते वेगळं कसं काय? एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी चालू शकत नाहीत” असं मनोज जरांगेंचे वकिल म्हणाले.
‘कोर्टात त्यावर काय उत्तर देणार ते तुम्ही ऐका’
नोटीसच्या प्रश्नावर म्हणाले की, “आझाद मैदान पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे. कोर्टात त्यावर काय उत्तर देणार ते तुम्ही ऐका. कालच्या सूचना पाळल्या. बऱ्याच गाड्या काढल्या, त्या तुम्ही दाखवा” असं मनोज जरांगेंचे वकील म्हणाले.
आज मनोज जरांगे पाटील स्वत: म्हणाले की, “रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेऊ नका घेऊन गेलो. सीएसटी बीएमसी रिकामी करा, केली. कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं? देवेंद्र फडणवीस यांनी अन्यायकारक आमच्याशी वागू नये”
