जरांगे सागर बंगल्याकडे निघाल्यावर सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मागणी

मराठा आंदोलनाचे प्रमुख असलेले मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. जरांगे सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाल्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांंचं नाव घेत पाहा नेमकी कोणती मागणी केली आहे.

जरांगे सागर बंगल्याकडे निघाल्यावर सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली 'ही' मागणी
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 4:59 PM

मुंबई : गेले अनेक दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली येथील आपल्या सभेमध्ये बोलताना शेवटच्या टप्प्यात आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा असल्याचं म्हणत आपल्याला मारण्यासाठी षडयंत्र रचल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. आता जरांगे मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालवलं आहे. परत एकदा मनोज जरांगे यांनी हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतं, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तजित केलं आहेत. रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे यामागे राजकीय हेतू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणामध्ये आक्रमक होत आंदोलनस्थळ सोडत अंतरवाली येथून चालायला सुरूवात केली. मनोज जरांगे पायी  सागर बंगल्याच्या दिशेने आपण जाणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र  समाजाच्या बांधवांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवलं. कारण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून उपोषण करत असल्यानं  जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे.

जरागेंनी फडणवीसांवर कोणते आरोप केले?

पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.