Marathwada Rain : 436 मृत्यू, 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मराठवाड्याची दाणादाण, मुख्यमंत्री पाहणी करणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 29, 2021 | 4:03 PM

जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Marathwada Rain : 436 मृत्यू, 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मराठवाड्याची दाणादाण, मुख्यमंत्री पाहणी करणार
Vijay Wadettiwar

मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठवाड्यात (Marathwada) तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत”, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

81 टक्केच पंचनामे

औरंगाबादमद्ये 24 जणांना वाचविण्यात यश आले. या महिन्यात 71 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर 26 जण जखमींची नोंद झाली आहे. 57 जनावरांचा मृत्यू,  तर मोठी 196 जनावरे दगावली. 17 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान गुलाब चक्रीवादळ सोडून झाले. 81 टक्केच पंचनामे झाले आहेत. 22 लाख हेक्टर जमीन आणि शेतक-यांचे नुकसान झाले. प्रचंड असे नुकसान आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

रस्त्यांचे खूप मोठे नुकसान आहे. जमिनी खरडून गेल्या. मोठ्या प्रमाणात कोल्हापूर बंधारे फुटले. शेती पंप वाहून गेले. काही ठिकाणी 4 वेळा तर काही ठिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली.

मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार

राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले.

राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.

1667 कच्ची घरे पडल्याची माहिती. 19 घरं पडल्याची माहिती. काल अनेक मंत्री मंत्रिमंडल बैठकीला उपस्थित नव्हते. ते आपआपल्या जिल्ह्यात होते, आपण पाहिले असेल अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहाणी केली होती. लातूर , बीड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबादचे पालकमंत्री तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री सुद्धा मराठवाडा दौ-यावर जाणार, असे मला मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

 • 10 पैकी 7 जिल्ह्यात 180 टक्क्यांपर्यंत पाऊस पडला
 • वीज पडून 196 जणांचा मृत्यू
 • या पावसाळ्यात 436 लोकांचा मृत्यू झालाय
 • गुलाब चक्रीवादळ आल्याने राज्यात अनेक भागात पाणी साचले.
 • धरणे ओव्हरफ्लो झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे
 • 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त
 • मराठवाड्यात 452 पैकी 381 महसूल क्षेत्रात अतिवृष्टी, त्यातील १२७ असे क्षेत्र जिथे ४-४ ते ८ वेळा अतिवृष्टी
 • हे प्रचंड नुकसान आहे.
 • शेतीचं वीजपंप वाहून गेलेत, ८१ टक्के पंचनामे पूर्ण झालेत
 • रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले आहेत.
 • केंद्राकडे वेगवेगळ्या वेळी मदत मागितली पण मदत मिळत नाही
 • डिसेंबर २०१९ मध्ये ९३ कोटीची मागणी केली काही मदत मिळाली नाही
 • निसर्गला १०६५ कोटी मागितले केंद्रानं दिले २६८ कोटी दिले
 • जून ऑक्टोबर २०२० मध्ये मागणी ३७२१ कोटीचा प्रस्ताव हतोा केंद्रानं ७०१ कोटी दिले
 • तोक्तेला २०३ कोटीचा प्रस्ताव होता, अद्याप मंजूर झाला नाही
 • जुलैला २०२१ ला १६५९ कोटी मागितले पण अजून पथक आलं नाही

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

लवकरात लवकर बाधित शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले.

नुकसानीचे पंचनामे सुरु करा

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत, असे निर्देश देखील त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. पण अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा म्हणत शेतकऱ्यांनी खचून जावू नये, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

संबंधित बातम्या 

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI