मुंबईत दुप्पट रुग्णवाढ! पुन्हा मास्कसक्ती करा, टास्क फोर्सची शिफारस, तर आज मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Mumbai Corona Cases : 25 एप्रिलच्या तुलनेत मुंबईत थेट दुप्पट रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत दुप्पट रुग्णवाढ! पुन्हा मास्कसक्ती करा, टास्क फोर्सची शिफारस, तर आज मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
मुंबईत उच्चभ्रु वस्तीत कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 12:03 PM

मुंबई : कोरोना रुग्णवाढ (Mumbai Corona cases) होत असल्याचनं सरकार आणि प्रशासन पुन्हा सतर्क झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray with Task Force) यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात पुन्हा बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती केली जावी, असा सल्ला देण्यात आला आहे. टास्क फोर्सनं तशी शिफारस या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी यांच्यासह टास्क फोर्समधील इतर सदस्य या बैठकीला हजर होते. सध्या कोरोना रुग्णवाढी मोठी नसली, तरिही रुग्णांची संख्या वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. अशातच अनेक कोरोना रुग्ण घरच्या घरीच टेस्ट (Corona Home Testing kit) करुन घरच्या घरीच उपचार घेत आहेत. अशा रुग्णांना क्वारंटाईन करणं गरजेचं असल्याचंही मत या बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पण तसं होत नसल्याचंही टास्क फोर्सकडून सांगण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर टास्कफोर्सनं महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत काय होतं, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. संध्याकाळी पाच वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे.

टास्क फोर्सच्या सूचना काय

  1. किमान बंद असलेल्या ठिकाणी मास्क लावणं बंधनकारक करा
  2. थिएटर, मॉल्समध्ये संसर्गाचा धोका
  3. रुग्णालयांमध्ये मास्क वापर सुरु करावा
  4. राज्यातील कोरोना चाचाण्यांची संख्या वाढवण्यावर भर द्यावा
  5. दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोस घेण्यासाठी 270 दिवसंचं अंतर कमी करुन 180 दिवसांवर आणावं

मंगळवारी मुंबईत 100 पेक्षा जास्त नवे रुग्ण

मुंबईत कोरोना रुग्णवाढ पुन्हा होत असल्याचं चित्र आहे. 57 दिवसांनंतर मुंबईत 100 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. 25 एप्रिलच्या तुलनेत मुंबईत थेट दुप्पट रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. 25 एप्रिलला 45 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 26 एप्रिल रोजी बीएमसी कडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई 102 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 85 रुग्ण बरे झआले आहे. सध्याच्या घडीला एकट्या मुंबईत 549 सक्रिय रुग्ण आहे. तर मुंबईतचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका आहे.

लहान मुलांना लस..

दरम्यान, कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता सहा ते बारा वर्ष वयाच्या मुलांनाही कोरोना लस देण्यात मंजुरी देण्यात आली आहे. कोवॅक्सिनच्या वापराला उपचारादरम्यान वापरसााठी मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर याआधीच बारावर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.