यापुढे गर्दी होणार नाही, मुख्यमंत्र्यांना खंत वाटणार नाही असेच कार्यक्रम घेऊ: महापौर किशोरी पेडणेकर

पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यात झालेल्या गर्दीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (mayor kishori pednekar reaction on social distancing fiasco in nair hospital program)

यापुढे गर्दी होणार नाही, मुख्यमंत्र्यांना खंत वाटणार नाही असेच कार्यक्रम घेऊ: महापौर किशोरी पेडणेकर
mayor Kishori Pednekar

मुंबई: पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यात झालेल्या गर्दीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापुढे गर्दी होणार नाही. मुख्यमंत्र्यांनाही खंत वाटणार नाही, असे कार्यक्रम करू, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. (mayor kishori pednekar reaction on social distancing fiasco in nair hospital program)

मुंबई महानगरपालिकेच्‍या नायर रुग्‍णालयाचा शतकपूर्ती सोहळा आज पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमातील गर्दीवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री जे दिसतं तेच बोलतात. त्यामुळेच त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या गर्दीवर बोट ठेवलं. व्यासपीठावर आमच्या राजकारण्यांची गर्दी अधिक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मंचावर गर्दी खूप होती हे खरं आहे. पण आम्ही मास्क घातले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करत होतो. परंतु मुख्यमंत्र्यांना ही गर्दी अपेक्षित नव्हती. त्यामुळे यानंतरचे कार्यक्रम घेताना आम्ही काळजी घेऊ. गर्दी होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याची खंत वाटणार नाही असेच कार्यक्रम आम्ही घेऊ, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

साथीचं संकट वाढू नये म्हणून प्रयत्न

यावेळी त्यांनी मुंबईती डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीवरही प्रतिक्रिया दिली. आरोग्य विभागाची काल आपण बैठक घेतली. या बैठकीत डेंग्यू, मलेरियाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेतला. पाणी साचल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे या आजाराची साथ आली आहे. एकीकडे कोरोनाचं संकट असताना मुंबईवर डेंग्यू, मलेरियाची साथ येऊ नये म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं.

ही तर सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेची शतकपूर्ती

नायर रुग्णालयाची शंभर वर्षांची कामगिरी पाहतानाही दमायला झाले. तर ही चांगली कामगिरी प्रत्यक्षात बजावताना सर्व वैद्यकीय मंडळींना किती कष्ट करावे लागतील, याची कल्पना येते. ही फक्त वर्षांची नव्हे तर सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेची शतकपूर्ती आहे. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये म्हणजे मुंबईकरांची हृदये आहेत. कोविड काळामध्ये सर्वात आधी 700 ते 1000 हजार रुग्णशय्या क्षमता तयार केलेले नायर रुग्णालय हे पहिले होते. कोविड काळामध्ये गर्भवती महिलांची प्रसुति सुखरुप करताना या रुग्णालयाने केलेली कामगिरी जगात वाखाणली गेली आहे. कोविड काळात खचून न जाता जीवाची पर्वा न करता महानगरपालिकेने काम केले. मुंबईकरांना अधिकाधिक आणि दर्जेदार अशा कोणत्या नागरी सेवा आपण देवू शकतो, याचाच विचार सतत महानगरपालिका करत असते, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईला पर्यावरण सक्षम बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे, नागरिक म्हणून आम्ही सर्वांनी देखील संवेदनशील ‌असणे गरजेचे आहे, असेही महापौरांनी नमूद केले. (mayor kishori pednekar reaction on social distancing fiasco in nair hospital program)

 

संबंधित बातम्या:

टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटीची घोषणा

हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव, ‘नायर’च्या शतकसोहळ्यात उद्धव ठाकरेंकडून 100 कोटींची घोषणा

कोरोनापाठोपाठ मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’; रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली

(mayor kishori pednekar reaction on social distancing fiasco in nair hospital program)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI