Mumbai Sakinaka case : मृत्यूपूर्वी पीडितेची रुग्णालयात चौकशी, महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

साकीनाका येथील बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Mumbai Sakinaka case : मृत्यूपूर्वी पीडितेची रुग्णालयात चौकशी, महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
mayor kishori pednekar

मुंबई: साकीनाका येथील बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. या महिलेला अमानूषपणे मारहाण करण्यात आली आहे. ही महिला 10 ते 12 वर्षापासून त्या पुरुषाबरोबर राहत होती. त्याच्यासोबत तिचे सातत्याने भांडण होत होतं, असं या महिलेच्या आईने सांगितल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. (mayor Kishori Pednekar visited the rajawadi hospital to meet the victim)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची चौकशी केली. डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेतली. तसेच रुग्णालायच्या डीन विद्या ठाकूर यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर महापौरांनी या महिलेच्या आईचीही विचारपूस करून या घटनेची माहिती घेत त्यांना धीर दिला. महिलेची आई सध्या तिच्या सोबत आहे. त्यांनीच मला आता सांगितलंय ही महिला 10 ते 12 वर्षापासून त्या पुरुषबरोबर रहात होती. त्यांच्यात भांडण सुरू होतं. तो तिला मारहाण करत असल्याचं कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केलं, असं महापौरांनी सांगितलं. इतकी क्रूरता का येते? पोलिसांनी तत्परता दाखवून तिला रुग्णालयात दाखल केले, असं सांगतानाच मुंबई सुरक्षित आहे, असं त्या म्हणाल्या.

महिलेचा मृत्यू

मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कायद्याचा धाकच राहिला नाही: कोटक

राज्यात घडत असणाऱ्या गुन्ह्यांसाठी आणि मुंबईतील निर्भयाच्या मृत्यूला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहीला नाही. गृहमंत्री म्हणून नजर आहे असं म्हणाले होते, पण तेही या सगळ्यांसाठी जबाबदार आहेत. 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. याला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार आहे, असं भाजपचे खासदार मनोज कोटक म्हणाले. पोलीस त्यांच्या परीने काम करत आहेत. तो तपासाचा भाग आहे. पण जी घटना घडलीये ती निंदनीय आणि समाजाला काळीमा फासणारी आहे. दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू: मलिक

महिलेचा मृत्यू दुखद आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू. नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

फाशीच द्या: भाई जगताप

एक आरोपी पकडला आहे. मी पोलिसांशी बोललो. निर्भया प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. थोड्या कालावधीत एका आरोपीपर्यंत पोहोचलो. इतर आरोपीही पकडले जातील. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, असं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले. (mayor Kishori Pednekar visited the rajawadi hospital to meet the victim)

 

संबंधित बातम्या:

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

Mumbai Sakinak Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

(mayor Kishori Pednekar visited the rajawadi hospital to meet the victim)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI