राहण्याची व्यवस्था नाही, कोरोना संसर्गित आणि संशयित एकाच वॉर्डमध्ये, अखेर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन

कांदिवलीतील एका रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांची वारंवार मागणी करुनही पुर्तता होत नसल्यानं वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे (Strike of Medical Staff in Kandivali amid Corona)

राहण्याची व्यवस्था नाही, कोरोना संसर्गित आणि संशयित एकाच वॉर्डमध्ये, अखेर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशातच आता कांदिवलीतील एका रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांची वारंवार मागणी करुनही पुर्तता होत नसल्यानं वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे (Strike of Medical Staff in Kandivali amid Corona). कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारादरम्यान पर्सनल प्रोटेक्शन किट (पीपीई किट) मिळत नाही. तसेच लांबून प्रवास करुन दररोज रुग्णालयात येणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जवळ राहण्याची व्यवस्थाही केली जात नसल्यानं अखेर या कर्मचाऱ्यांनी नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन जागं होणार की नाही हे पहावं लागणार आहे.

आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितलं, “या रुग्णालयात पर्सनल प्रोटेक्श किट उपलब्ध नाहीत. लांबून येणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या जवळ साधी राहण्याची देखील व्यवस्था नाही. या रुग्णालयात 20 कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. तसेच 60 कोरोना संशयित रुग्ण आहेत. या संशयित रुग्णांना वेगळं ठेवण्याऐवजी एकत्रच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे संशयित रुग्णांपैकी ज्यांना संसर्ग नाही, त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे संसर्गित रुग्ण आणि संशयित रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार होणं अत्यावश्यक आहे.”

संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून तातडीने कोरोना रुग्ण आणि संशयित रुग्णांना स्वतंत्रपणे उपचार करण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या रुग्णालयात एकूण 275 नर्सेस काम करतात. परिचारिका, डॉक्टर्स आणि अन्य रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत वारंवार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र, यानंतरही याला प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेणार का हे पाहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona Effect | एमपीएससी स्पर्धा परीक्षेला अनिश्चित काळासाठी स्थगिती

सकाळी नऊ ते अकरा ठरली ‘घातवेळ’, पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले

लॉकडाऊनमध्ये पांडुरंगाची महापूजा करणं अंगलट, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

Strike of Medical Staff in Kandivali amid Corona

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI