स्वस्त घराचं आमिष, माजी गृहनिर्माण राज्यमंत्र्यांच्या नावे 25 लाखांची फसवणूक

पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबलने माजी गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या नावाचा वापर करुन म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो म्हणून 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

स्वस्त घराचं आमिष, माजी गृहनिर्माण राज्यमंत्र्यांच्या नावे 25 लाखांची फसवणूक
Follow us
| Updated on: Jan 31, 2020 | 8:14 AM

मुंबई : मुंबईत आपलं घर व्हावं हे सर्वांचं स्वप्न असतं. पण, अनेकदा लोक घर घेण्याच्या नादात फसतात. म्हाडामध्ये घर मिळवून देतो, म्हणून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार आतापर्यंत अनेकदा उघडकीस आलेला आहे (MHADA Fraud). मात्र, चक्क पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबलने माजी गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या नावाचा वापर करुन म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो म्हणून 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे (MHADA Fraud).

मुंबई पोलीस दलात काम करणारा नितीन गायकवाड याने वर्ष 2011 ते 2012 दरम्यान त्याची माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी चांगली ओळख असून मला पंचवीस लाख द्या, मी तुम्हाला म्हाडा मधलं स्वस्तात आणि मोठं घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाकडून 25 लाख उकळले. या सगळ्या प्रकारानंतर घरही नाही मिळालं आणि पैसेही नाही मिळाले. त्यामुळे पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गायकवाडविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आरोपी नितीन गायकवाड हा यापूर्वी माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर त्यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. याचाच फायदा घेत म्हाडा मधलं घर तुम्हाला स्वस्तात राहायला देतो आणि त्यानंतर तुमच्या नावावर करुन देतो. त्यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागतील, असं सांगून त्याने एकाडून 25 लाख उकळले होते. याप्रकरणी आता मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी नितीन गायकवाड याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

पीडित व्यक्ती जगन्नाथ भिकाजी कदम हे फोर्टला राहतात. छोटं घर आणि मोठं कुटुंब असल्याकारणाने त्यांनी आरोपीला वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून पैसे दिले होते. मात्र, त्यांना पैसे आणि घर या दोन्ही गोष्टी न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. सध्या आरोपी गायकवाड याचा पोलीस शोध घेत आहेत. ह्यापूर्वीही आरोपी गायकवाडवर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.