कोरोनाची साथ ओसरल्यानंतर मुंबईत परप्रांतीय कामगारांच्या ‘घरवापसीला’ सुरुवात

Coronavirus in Mumbai | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन लागण्यापूर्वीच अनेक परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता. राज्य सरकारने आवाहन करुनही हे मजूर आपल्या गावी गेले होते. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला होता.

कोरोनाची साथ ओसरल्यानंतर मुंबईत परप्रांतीय कामगारांच्या 'घरवापसीला' सुरुवात
परप्रांतीय कामगार
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 2:48 PM

मुंबई: मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यामुळे आता परप्रांतीय कामगारांनी पुन्हा शहरात दाखल व्हायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन (LTT) तब्बल 15 लाख मजूर उत्तर प्रदेश, बिहार आण झारखंडमधील आपापल्या गावी परतले होते. मात्र, आता मुंबईतील लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर हे मजूर हळूहळू मुंबईत परतायला सुरुवात झाली आहे.  (Migrant labourers get back in Mumbai after Coronavirus get in control)

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे रोजगार ठप्प झाले होते. त्यामुळे मुंबईतील परप्रांतीय कामगारांची उपासमार होऊ लागली होती. त्यानंतर या मजुरांनी हजारो मैलांची पायपीट करत आपले गाव गाठले होते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन लागण्यापूर्वीच अनेक परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता. राज्य सरकारने आवाहन करुनही हे मजूर आपल्या गावी गेले होते. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, आता मजूर पुन्हा मुंबईत दाखल होऊ लागल्याने ही समस्या लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.

‘रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करु’

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबई महानगरापालिका प्रयत्न करत आहे. आम्हाला यश येत आहे. मात्र, अद्यापही धोका कमी झालेला नाही. दुसरी लाट थोपवली जात असली तरी तिसरी लाट अधिक धोकादायक आहे. मुंबई महानगरपालिका आगामी काळात वेगाने लसीकरण करण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या घडीला मुंबईत दिवसाला 500 ते 600 रुग्ण सापडत आहेत. ही रुग्णसंख्या कमी झाली तरच मुंबईत लोकल पुन्हा सुरु करण्याचा विचार केला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

सोसायट्यांमध्येही महापालिका लसीकरण सुरू करणार: महापौर पेडणेकर

देशात तरुणांचं मोफत लसीकरण सुरू होत आहे. वारंवार स्थगिती दिली गेल्याने अनेकांनी खासगी रुग्णालयातून लस घेतली. मात्र, आता सर्वात मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण सुरू करत आहोत. सर्वसामान्य मुंबईकरांचं लसीकरण महापालिका करणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवस वॉक इन लसीकरण केलं जात आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबद्दल बोललं जात होतं. पण, आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की, ज्याप्रमाणे आरोग्य शिबिरं घेतली जातात, त्याचप्रमाणे पाच किंवा किमी अंतरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिरं झाली पाहिजे. सरकारकडून लस मिळाली, तर महापालिका अशा स्वरूपातही लसीकरण करेल. उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू होत आहे. रिक्षाचालक आणि फेरीवाले यांचं लसीकरण करण्याला प्राध्यान देण्याचा विचार केला जात आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

(Migrant labourers get back in Mumbai after Coronavirus get in control)

Non Stop LIVE Update
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.