मोठी बातमी: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

मोठी बातमी: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

आज मुंबईतील कुर्ला दूध डेअरीच्या परिसरात दूधाच्या गाड्या पोहोचल्या. | Milk Supply

Rohit Dhamnaskar

|

Dec 08, 2020 | 8:57 AM

मुंबई: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवारी दुपारनंतर मुंबईत दुधाचे  टँकर्स (Milk Supply) येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समजताच आता नागरिकांनी दूध खरेदीसाठी गर्दी केली आहे. (Milk supply in Mumbai will be stop on backdrop of Bharat Bandh Andolan)

तत्पूर्वी आज मुंबईतील कुर्ला दूध डेअरीच्या परिसरात दूधाच्या गाड्या पोहोचल्या. यानंतर दुग्ध वितरण संघाकडून दुपारनंतर मुंबईत दूध पाठवले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांनी आत्ताच दूध विकत घ्यावे, असे आवाहन राजाराम बापू पाटील सहकारी दूध लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. परिणामी सामान्य ग्राहक दुधाच्या खरेदीसाठी डेअरी आणि दुकानांवर गर्दी करताना दिसत आहेत.

‘भारत बंद’च्या दिवशी बेस्ट आणि टॅक्सी नेहमीप्रमाणे धावणार

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला (Bharat Bandh) मुंबईत सकाळच्या सत्रात फारस प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण, मुंबईच्या रस्त्यांवर आज सकाळपासूनच वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे दिसत आहे. बेस्ट बसेस, टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यांवर नेहमीप्रमाणे धावत आहेत.

बेस्ट प्रशासनाने यापूर्वीच आम्ही ‘भारत बंद’ आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आज बेस्टच्या बसेल लोखंडी जाळ्या लावून रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील टॅक्सी संघटनेकडूनही मंगळवारी आपली सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील वर्दळ सामान्य राहण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत पाचही बाजार समित्या बंद

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले असून, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या असून नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकाऱ्यांसोबत माथाडी कामगारांचा देखील रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

पुण्यातही कडकडीत बंद

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे. एरवी दररोज किमान 900 मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला.

संबंधित बातम्या:

‘भारत बंद’ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद

भारत बंद Live Updates | बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली

(Milk supply in Mumbai will be stop on backdrop of Bharat Bandh Andolan)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें