उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात, सामंत सुखरुप

सामंत एकदम सुखरूप असून सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. जखमी सिक्युरिटी ऑफिसरला कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात, सामंत सुखरुप
Breaking News

मुंबई : मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला. आज रात्री 8 वाजता ही घटना घडली सामंत यांच्या ताफ्यातील स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. गाडीमध्ये सामंत एकटेच होते. सामंत एकदम सुखरूप असून सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. जखमी सिक्युरिटी ऑफिसरला कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संरक्षण करणाऱ्या सर्वाचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Published On - 9:49 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI