AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Bhayandar Crime : अवघ्या तासाभरात कुटुंब उद्ध्वस्त , साखरपुड्याला जाण्यावरून भयंकर वाद, पत्नीवर चाकूने हल्ला, मुलगा आडवा आला अन्..

मिरा-भाईंदरमध्ये एका शुल्लक कौटुंबिक वादामुळे हृदयद्रावक घटना घडली. पती-पत्नीमधील भांडणात वडिलांनी पत्नीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलालाच पित्याचा चाकू लागला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Mira Bhayandar Crime : अवघ्या तासाभरात कुटुंब उद्ध्वस्त , साखरपुड्याला जाण्यावरून भयंकर वाद, पत्नीवर चाकूने हल्ला, मुलगा आडवा आला अन्..
भयानक घटनेने मुंबई हादरली
| Updated on: Jul 30, 2026 | 10:55 AM
Share

शुल्लक मुद्यावरून पती-पत्नीत झालेल्या वादाला भयानक वळण मिळालं आणि अवघ्या तासाभरात एक संसार उद्ध्वस्त झाला. मिरा-भाईंदरमधील एका कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. पत्नीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांपासून आईला वाचवण्यासाठी मदतीला धावलेल्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागला. चाकू लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळेपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलगा गमावल्यामुळे आईच्या आक्रोशाने अख्खा परिसर स्तब्ध झाला, तिच्या अश्रूमुळे सर्वांचं काळीज पिळवटून निघालं. उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटलेल्या या दुर्दैवी घटनाची सध्या सर्वत्र चर्चा असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पती-पत्नीमध्ये एका शुल्लाक कारणावरून भांडण झालं. कुटुंबातील एका नातेवाईकाच्या (भाच्याच्या) साखरपुड्याला जाण्यावरून त्यांचा वाद झाला होता आणि बघता बघता तो विकोपाला गेला. संतप्त पतीने पुढला मागचा विचार न करता चाकू घेऊन रागाच्या भरात पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रागावलेल्या वडीलांची ही कृती पाहून त्यांचा मुलगा आपल्या आीला वाचवण्यासाठी मध्ये पडला. मात्र त्या हल्ल्यादरम्यान, पित्याकडून तो चाकू त्यांच्याच मुलाला लागला आणि तो गंभीर जखमी झाला.

मुलाचा दुर्दैवी मृत्यू

आपण काय कून बसलो हे पाहून पित्याचे अवलान गळाले. मात्र त्यांन जखमी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. कारण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी वडिलांना ताब्यात घेतले. संबंधिति पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भाईंदर पश्चिम विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) कन्हैया थोरात यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती