AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता…

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडली आहे. आता या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकारणी,बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांसह सर्वांचे बंदुकीचे लायसन्स तपासण्यात येणार आहे.

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता...
| Updated on: Feb 05, 2024 | 9:47 AM
Share

मुंबई, दि. 5 फेब्रुवारी 2024 | भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जागेवरुन वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी दोघांना उल्हानगर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यावेळी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर खळबळ उडाली. राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला. आता आणखी एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता पोलिसांना सर्वच जणांच्या बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणानंतर…

गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा फरार आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे. त्याचवेळी राज्य सरकारने पोलिसांना सर्वांच्या बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर ठाणे पोलीस बंदुकीचे लायसन्स असलेल्या सर्वांची पडताळणी करणार आहे.

ठाण्यात किती जणांकडे बंदुकीचे परवाने

ठाण्यात आतापर्यंत जवळपास ४ हजार जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आले आहे. त्यात अनेक राजकारणी, बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांचा समावेश आहे. राजकारणी बंदुकीचे लायसन्स मिळवण्यात अग्रस्थानी आहेत. परंतु आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणानंतर ठाणे पोलीस आता सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत.

…तर लायसन्स रद्द होणार

पोलीस पडताळणीत आता बंदुकीचे लायसन्स का हवे? ती कारणे जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर आवश्यकता नसल्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे आता कोणालाही बंदूक बाळगता येणार नाही.

महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच राहुल पाटील यांना जनरल वार्डात शिफ्ट करण्यात आले. दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पथक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

हे ही वाचा

गणपत गायकवाड, महेश गायकवाड वाद जमिनीवरुन नव्हे तर वेगळेच गणित

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...