AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mmrda Monsoon Control Room : पावसाळ्यात आपत्ती आल्यास फोन कुठे कराल?, एमएमआरडीएचे टोल फ्रि नंबर जारी; आत्ताच सेव्ह करा

मान्सून केव्हाही मुंबई आणि राज्यात येण्याची शक्यता आहे. अशात मुंबईत पावसाळ्यातील समस्या सोडविण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी एमएमआरडीएन सज्ज झाली असून मान्सूनमध्ये येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने पुर्ण तयारी केली असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.

Mmrda Monsoon Control Room : पावसाळ्यात आपत्ती आल्यास फोन कुठे कराल?, एमएमआरडीएचे टोल फ्रि नंबर जारी; आत्ताच सेव्ह करा
Mumbai rainy seasonImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 31, 2024 | 5:36 PM
Share

मान्सून केरळात धडकलाय आणि केव्हाही मुंबई आणि राज्यात येण्याची शक्यता आहे. अशात मुंबईत पावसाळ्यात काही संकट आले तर तातडीने नागरिकांना मदत मिळावी यासाठी एमएमआरडीएने आपला 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात अधिकारी चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील तसेच महापालिका, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनडीआरएफ आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतील असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शहरात एमएमआरडीएचे विविध मेट्रो प्रकल्पांचे काम सुरु आहे. तसेच पुलाचे आणि विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांना आणि पादचाऱ्यांना येणाऱ्या त्रासाची अडचण त्वरित दूर करण्यासाठी एमएमआरडीएने हा आपत्कालिन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. एमएमआरडीएच्या हद्दीत कुठे झाडे उन्मळून पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे अशा विविध संकटांवर मुंबईकरांना नियंत्रण कक्षाची मदत घेता येणार आहे. नियंत्रण कक्षाचे कर्मचारी 24 तास आणि तीन शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत.

 आपत्कालिन नियंत्रण कक्षाचे काम

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सूनच्या पार्श्वभुमीवर आपत्कालिन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. सदर नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निरसन आणि निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था इत्यादी विविध आपत्ती नियंत्रण संस्थांशी समन्वय साधण्यात येणार आहे. एमएमआरडीएने स्थापन केलेला नियंत्रण कक्ष 1 जून  ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कार्यरत असणार असून नागरीक 022-26591241, 022-26594176, 8657402090आणि 1800228801 ( टोल फ्री ) या हेल्पलाईन क्रमांकांच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात.

एमएमआरडीएच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारी नोंदविणे, तसेच या तक्रारी संबंधित अभियंता,अधिकारी,कर्मचारी यांकडे वर्ग करणे, तक्रार एमएमआरडीएसंबंधित नसल्यास ती संबंधित प्राधिकरण, महानगर पालिका आणि विविध संस्थांकडे वर्ग करणे, त्यासोबतच सर्व तक्रारींचा पाठपुरावा करून त्यावर झालेल्या कार्यवाहीबाबतचे अभिप्राय तक्रार करणाऱ्या नागरिकांना कळविणे आदी बाबींवर एमएमआरडीए काम करणार आहे.

एमएमआरडीएचे प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीए सध्या मेट्रो रेल प्रकल्प, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार, ऐरोली-काटाई नाका बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्प, शिवडी-वरळी कनेक्टर, छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासोबतच एमयुआयपी आणि ओएआरडीएस अंतर्गत विविध रस्ते आणि पुलांची कामे असे प्रकल्प राबवित आहे.

मेट्रो प्रकल्पस्थळी सुमारे 300 जणांची टीम

मान्सून दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीसाठी प्रत्येक मेट्रो प्रकल्प स्थळांवर एक अभियंता आणि दहा मजुरांची टीम तैनात असेल. विविध मेट्रो प्रकल्पस्थळांवर अशा एकूण 19 आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे तीनशेपेक्षा अभियंते आणि कामगार तैनात असतील. प्रकल्पाच्या स्थळी रात्रीच्या वेळी एमएमआरडीए, सल्लागार, कंत्राटदारांकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. त्यासोबतच एकूण 18 आपत्कालिन केंद्र, 18 देखभाल वाहने आणि 17 ॲम्ब्युलन्सची सोय केली आहे. ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे.

प्रकल्पलगतच्या भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी 131 पाणी उपसा करणारे पंप बसविण्यात आले आहेत. मेट्रो प्रकल्प स्थळालगत वाहनांच्या आणि पादचाऱ्यासाठी अधिक रुंदीचा रस्ता उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शक्य असेल त्या भागातील बॅरिकेड्स आत खेचण्यात आले आहेत. मेट्रोचे काम पूर्ण झालेल्या भागातील बॅरिकेड्स काढण्यात आली आहेत. काम पूर्ण झाल्यावर उर्वरित बॅरिकेड्स लागलीच काढली जाणार आहेत. या सोबतच प्रकल्पस्थळावरून मातीचा ढीग काढणे, खराब झालेले नाले आणि दुभाजक दुरूस्त करणे, पाईलिंग आणि पाईल कॅपची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे ध्येय आहे. महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही कामे सुरू ठेवली जाणार आहेत. त्यासोबतच विद्युत उपकरणांमुळे उद्भवणारे धोके टाळण्यासाठी विद्युत उपकरणांची आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

अटल सेतू मान्सून रेडी

भारतातील सर्वाधिक लांबीच्या शिवडी ते न्हावा शेवा अटल सागरी सेतूमुळे प्रवासाचा एक तास वाचत आहे . हा पूल मान्सून दरम्यान देखील सुरू रहावा यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सागरी सेतुवर पाणी साचण्यास प्रतिबंध करण्यासाठी ड्रेनेज सिस्टमची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप बसवलेले आहेत. अटल सेतू प्रकल्पासाठी 1 अभियंता आणि 10 मजुरांचे आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन केले आहे. अटल सेतूवरील गाड्यांच्या माध्यमातून होणारी तेल गळती किंवा इतर निसरड्या पदार्थांसारख्या संभाव्य स्लिप आणि ट्रिप धोक्यांचे निवारण करण्यासाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीम आणि अग्निशमन वाहन (FRV) टीम द्वारे पूलावर वेळोवेळी गस्त घालण्यात येणार आहे. जेणेकरून अपघातांना आळा घालता येईल. पावसाळ्याच्या कालावधीत, अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी आणि प्रकल्पामध्ये अतिरिक्त व्हिज्युअल तपासणी करण्यात येणार आहे. अटल सेतूसाठी आपत्कालीन टोल फ्री क्रमांक- 1800 203 1818 जारी केला आहे.

सूर्या प्रकल्प सज्ज

वसई विरारच्या नागरिकांना सूर्या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच मान्सून दरम्यान देखील नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी सूर्या प्रकल्पामध्ये विशेष काळजी घेतली आहे. कावडास येथील उदंचन केंद्रामध्ये पूरस्थितीनिर्माण झाल्यास पाणी ओढणाऱ्या पंपांना कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी ते पुर रेषेच्या पातळीपासून 2 मीटर उंच बसवलेले आहेत. तसेच उदंचन केंद्रातील साठलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त क्षमतेचे उपकरण उपलब्ध केले आहेत. मान्सून दरम्यान जलवाहिनी आणि उपकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी कंत्राटदारामार्फत गस्त पथकाची स्थापना करण्यात आली आहे. काशिदकोपर येथील टेकडीवर उभारण्यात आलेल्या जलाशय आणि टेकडीच्या संरक्षणाकरीता उतार संरक्षण उपाययोजना केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.