AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : तर आमचं आंदोलन चालूच रहाणार, राज ठाकरेंकडून पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची ‘डेसिबल’ आठवण

मशिदीवरील भोंगेच उतरवा. तुम्हाला प्रार्थना म्हणायची म्हणा. तुम्हाला लाऊडस्पीकर का लागतो?

Raj Thackeray : तर आमचं आंदोलन चालूच रहाणार, राज ठाकरेंकडून पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची 'डेसिबल' आठवण
सांगलीनंतर परळी कोर्टाचं राज यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 1:36 PM
Share

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आज पुन्हा एकदा भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. एका दिवसापुरतं हे आंदोलन नाही. आमचं आंदोलन सुरूच राहणार. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे (LoudSpeaker Ban) उतरवले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार, असं सांगतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने (supreme court) ठरवून दिलेल्या आवाजाच्या डेसिबलचीही आठवण करून दिली. मशिदी आणि मंदिरांवरचे भोंगेही उतरवले पाहिजे. काल विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं इतक्या मशिदींना भोंग्यांसाठी परवानगी दिली. जिथे मशिदीच अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींना भोंगे लावण्यासठी सरकार अधिकृत परवाने देत आहे. ही कल्पनेबाहेरची गोष्ट आहे. कशासाठी देता परवानगी? सकाळच्या अजानपुरता हा विषय नाही. चार ते पाच वेळा बांग दिली जाते. ती जर त्यांनी परत दिली. तर आमचे लोकं हनुमान चालिसा त्या त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणारच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायचं असेल तर लोकवस्तीत 45 ते 55 डेसिबल आवाज लावू शकता तीही परवानगी घेऊन. तुम्ही 365 दिवसाची परवानगी कशी देता? आम्हाला एक दिवसाची, 10-12 दिवसांची लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाते. त्यांना 365 दिवसाची परवानगी कशासाठी? त्यांनीही रोज परवानगी द्यावी. 45 ते 55 डेसिबल म्हणजे घरातील मिक्सर एवढा आवाज. पोलिसांना एकच धंदा आहे का की डेसिबल मोजायचं. एकच काम आहे का?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

आंदोलन सुरूच राहणार

मशिदीवरील भोंगेच उतरवा. तुम्हाला प्रार्थना म्हणायची म्हणा. तुम्हाला लाऊडस्पीकर का लागतो? कुणाला ऐकवायची आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. निर्णय लागत नाही, तोपर्यंत असंच सुरू राहणार. सरकार म्हणते आम्ही आदेशाचं पालन करतो तर सर्व करा. सकाळी अजान झाली म्हणजे आम्ही खूश झालो असं अजिबात नाही. दिवसभरातील अजान भोंग्यावरून नको. तर हनुमान चालिसा चालूच राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

फायदा काय कोर्टाचा?

मशिदींवरील भोंग्याचं डेसिबल मोजलं जात नाही. डेसिबलचं उल्लंघन होत आहे. सुप्रीम कोर्ट काय करणार हे पाहतो. एकदा निकाल दिल्यानंतर सरकार काही करत नसेल तर फायदा काय कोर्टाचा? कोर्ट काय करणार आहे? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ