राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, CAA समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवणार

राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, CAA समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवणार

मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात 'सीएए'च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार आहे

अनिश बेंद्रे

|

Jan 27, 2020 | 9:21 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात आज (सोमवार 27 जानेवारी) मनसेची बैठक होणार आहे. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने 9 फेब्रुवारीला आयोजित केलेल्या मोर्चाची दिशा यावेळी ठरवली जाणार (Raj Thackeray MNS Meeting on CAA) आहे.

मनसेच्या महाअधिवेशनानंतर पक्षात नवी उर्मी आलेली दिसत आहे. महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली होती.

देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

‘अचानक देशात मोर्चे निघायला लागले, मुस्लिम रस्त्यावर उतरले. मला काहींनी सांगितलं की त्यांना काश्मिर, राम मंदिराचा राग आहे. त्याचा एकत्रित राग आता बाहेर पडत आहे. ते जर बाहेरच्या मुस्लिमांसोबत उभे राहत असतील, तर आम्ही त्यांना का साथ द्यावी? अनेक जण म्हणतात, राज ठाकरेचा रंग बदलला का? मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही.’ असं राज ठाकरे भाषणात म्हणाले होते.

राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करत महाअधिवेशनाला सुरुवात केली होती. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी देत एकच जल्लोष केला. त्यानंतर दिवसभर मनसेच्या विविध नेत्यांची भाषणं झाली.

Raj Thackeray MNS Meeting on CAA

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें