बिलात 50 टक्के सूट द्या, वीज कापू नका, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला

मनसेच्या शिष्टमंडाळाने आज (2 जुलै) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली (MNS delegation meets energy minister Nitin Raut).

बिलात 50 टक्के सूट द्या, वीज कापू नका, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला


मुंबई : वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना आवाजवी बिलं आकारले (MNS delegation meets energy minister Nitin Raut). त्यामुळे राज्यभरात याबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडाळाने आज (2 जुलै) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं. यावेळी ऊर्जामंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली (MNS delegation meets energy minister Nitin Raut).

नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या बैठकीत मनसेने ऊर्जा मंत्र्यांकडे चार प्रमुख मागण्या मागितल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलं असल्याचं अभ्यंकर यांनी सांगितलं. ऊर्जा मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा : वर्क फ्रॉम होममुळे वीजेचा वापर वाढला, प्रत्यक्ष रिडिंग घेऊ : ऊर्जामंत्री

“काही नागरिक गावी गेले होते. त्यांनी विजेचा वापर केला नाही. तरीही त्यांना दुप्पट-तिप्पट वीज बिल आलं आहे. या विषयावर सविस्तर चर्चा झाली. काही विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. ती सध्या गावी गेली आहेत. त्यांची शहरातील घरे बंद आहेत. तरीही वीज बिल जास्त आले आहेत. आम्ही सर्व सदस्यांनी आपापल्या भागातील नागरिकांची वीज बिलं गोळा केली आहेत. काही नागरिकांचं दुप्पट तर काहीचं तीन पट, पाच पट, दहा पट जास्त बिल आलं आहे”, असं अविनाश अभ्यंकर म्हणाले.

“ऊर्जामंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, फक्त करेक्शन नाही, तर करेक्शननंतरही तफावत आढळली तर तेही बघू. पण आम्ही करेक्शन केलेल्या बिलमध्ये कमीत कमी 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. कारण लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुंटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहेत. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना कारावा लागत आहे. त्यामुळे याकडे माणुसकीच्या नात्याने बघितलं पाहिजे”, असं आवाहन अभ्यंकर यांनी केलं

“खासगी वीज कंपन्यांना आमचं सांगणं आहे की, आता पैसे कमवायचं थोडं थांबवा. ज्या लोकांनी तुम्हाला कमवून दिलं आहे, त्यांचा विचार करा. जनतेचा विचार करा, त्यांना त्रास देऊ नका”, असं अविनाश अभ्यंकर म्हणाले.

“जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्याची गरज नाही. मनसेने यापूर्वीच सिद्ध केलंय की ते काय करतात. ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा”, असंदेखील अविनाश अभ्यंकर यावेळी म्हणाले.

मनसेच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

1) ग्राहकांना सुधारित वीज बिलात 50 टक्के सवलत देण्यात यावी. तसेच लॉकडाऊन काळात केलेली दरवाढ (fixed charges व electricity duty) रद्द करुन पूर्वीचेच दर आकारा.
2) ग्राहकांना बिलं भरण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
3) कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत करु नका.
4)ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करा.

मनसेच्या शिष्टमंडळाने ऊर्जा मंत्र्यांना दिलेले पत्र

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI