वीज ग्राहकांनी 50 टक्केच बिल भरावे, ‘बेस्ट’ पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मनसेचे आवाहन

'बेस्ट' वीज ग्राहकांनी सध्या फक्त 50 टक्के वीज बिल भरावे, असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले.

वीज ग्राहकांनी 50 टक्केच बिल भरावे, 'बेस्ट' पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मनसेचे आवाहन
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 4:53 PM

मुंबई : ‘बेस्ट’च्या वाढीव वीज बिलाबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने आज बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, ‘बेस्ट’च्या ग्राहकांनी सध्या फक्त 50 टक्के वीज बिल भरावे, असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले. (MNS meets BEST electricity department officials)

मुंबई शहर परिसरातील बेस्टच्या वाढीव वीज बिलांच्या शकडो तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय अभियंत्यांना देण्यात आल्या. “कुणाचेही वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. सध्या पन्नास टक्के बिल भरा आणि उर्वरित रिडींगनंतर भरा” असं आश्वासन विभागीय अभियंत्यांनी दिले असल्याचा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

“वाढीव बिलासंदर्भात बेस्टच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली. सध्या कुणाचेही विद्युत कनेक्शन कापले जाणार नाही असे त्यांनी सांगितले” असे देशपांडे म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“ग्राहकांना आवाहन आहे, की त्यांनी सध्या फक्त 50 टक्के वीज बिल भरावे. ज्यावेळी प्रत्येक मीटर रिडींग घेतले जाईल, त्यावेळी बिलाची रक्कम अ‍ॅडजस्ट केली जाईल. बिलांसदर्भात इन्स्टॉलमेंट सुविधासुद्धा उपलब्ध करुन देण्यात येईल” असे बैठकीत बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला.

काही दिवसांपूर्वी (2 जुलै) मनसेच्या शिष्टमंडाळाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं होतं. ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीला मनसे नेते अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील  उपस्थित होते.

मनसेच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

1) ग्राहकांना सुधारित वीज बिलात 50 टक्के सवलत देण्यात यावी. तसेच लॉकडाऊन काळात केलेली दरवाढ (fixed charges व electricity duty) रद्द करुन पूर्वीचेच दर आकारा. 2) ग्राहकांना बिलं भरण्यासाठी पुरेसा वेळ द्या. 3) कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत करु नका. 4) ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करा.

संबंधित बातम्या :

बिलात 50 टक्के सूट द्या, वीज कापू नका, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला

(MNS meets BEST electricity department officials)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.