मान्सूनचं मुंबईत 6 जूनला आगमन! राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढचे 4 दिवस पावसाचे

Maharashtra Monsoon Update weather News : राज्यातील 9 जिल्हयांचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या चार ते पाच दिवसात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे

मान्सूनचं मुंबईत 6 जूनला आगमन! राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढचे 4 दिवस पावसाचे
पावसाची खबरबातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 6:55 AM

मुंबई : घामाघूम झालेल्या मुंबईकरांना (Mumbai Rain Update)पावसाचे वेध लागले आहे. मुंबईत वातावरण तापल्यानं सगळ्यांना उकाडा असह्य झालाय. अशातच आता मुंबई मान्सूनचा (Monsoon Rain in Mumbai) पाऊस कधी बरसणार, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 6 जून रोजी मुंबई मान्सूनच्या पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. अंदमानमध्ये दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास असाच सुरु राहिला तर 6 जूनपासून मुंबईकरांना मान्सूनचा दिलासा मिळेल, अशी शक्यताय. तर येत्या चार दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra Weather Update News) विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

विदर्भाला दिलासा नाहीच!

येत्या चार ते पाच दिवसांत दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात तापमान कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. तसंच विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : दहा मोठ्या बातम्या

27 तारखेला केरळमध्ये

मान्सूनचं अंदमानात आगमन 48 तासांपूर्वीच झालंय. त्यानंतर आता मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं जातंय. मान्सूनचा पुढचा प्रवास असाच सुरु राहिला, तर मुंबईतही मान्सूनचा प्रवेश 6 जून रोजी होईल, अशा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील 9 जिल्हयांचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या चार ते पाच दिवसात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुढचे दोन दिवस केरळ किनारपट्टीच मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा सांगली, तसंच परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उकाड्याने हैराण

दरम्यान, वाढलेल्या तापमानानं विदर्भातील जनता हैराण झाली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पारा 40 च्या वर आहे. दरम्यान, उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.