एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवा, आंदोलन सुरूच राहणार; सदाभाऊ खोत यांचा इशारा

एसटी कामगारांचा संप सुटत नसल्याने एसटीच्या खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवा, आंदोलन सुरूच राहणार; सदाभाऊ खोत यांचा इशारा
sadabhau khot
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 7:50 AM

मुंबई: एसटी कामगारांचा संप सुटत नसल्याने एसटीच्या खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली तरी आंदोलन सुरूच राहील. एकही कामगार घरी जाणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. एसटीचे करणार अशी अफवा सरकार पसरवत आहे. त्यामुळे आमचा संप संपेल आणि सर्व एसटी कर्मचारी आपापल्या घरी जातील असं सरकारला वाटत आहे. पण हा सरकारचा भ्रम आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत असे काहीही होणार नाही. आम्ही आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असं खोत यांनी स्पष्ट केलं.

हवं तर श्रेय घ्या, पण न्याय द्या

अनिल परब हे खूप चांगले व्यक्ती आहेत. आम्ही त्यांना पाहिले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की अनिल परब आमचे म्हणणे नक्कीच मान्य करतील. हवं तर एसटी कामगारांच्या मागण्यांचं श्रेय सरकारने घ्यावे, आमचा आक्षेप नाही. मात्र आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, असं ते म्हणाले.

सरकारचा दशक्रिया विधी करणार

दरम्यान काल खोत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 9 वा दिवस आहे. नऊ दिवस होऊनही मायबाप सरकारला जाग येत नाही. सरकारला जागं करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बस आगारात सरकारचा दशक्रिया विधी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

आम्ही तर कुठं म्हणतोय आडवळणानं जाऊ

पवार साहेब जे म्हणत आहे की मध्य मार्ग काढू, तर आम्ही तरी कुठे म्हणतोय की आडवळणानं जाऊ. मध्यम मार्ग काय आहे तो पवारसाहेब तुम्ही सांगा. ते अभ्यासू व्यक्ती आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण नेमचा त्यांचा मध्य पूर्वेला आहे, दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे हे मात्र कधीच कुणाला समजून आलं नाही. मला वाटतं की राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या. पण ज्या कामगारांनी तुम्हाला मोठं केलं असं त्यांच्या अधिवेशनात सांगता मग त्या कामगारांचे अश्रू पवारसाहेबांना का दिसले नाहीत? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय. तसंच पवार साहेब पावसात भिजले, पण आज एसटी कर्मचारी पवासात भिजतोय, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम पवारसाहेब करत नाहीत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचा टोलाही खोत यांनी लगावलाय.

संबंधित बातम्या:

उदयनराजे कुठं आहेत? बंधुराजांचा विषय रामराजेंना विचारला पाहिजे, शिवेंद्रराजेंची मिश्किल टिप्पणी

सासऱ्याचा तलवार हल्ला, सुनेचे दोन्ही हात कापले, डॉक्टरांनी 9 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जोडले

भाजपकडून संपकऱ्यांची कोंडी, हे तर दहशत, ब्लॅकमेल आणि वैफल्याचे राजकारण; शिवसेनेचा विरोधकांवर जोरदार हल्ला

Non Stop LIVE Update
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.