NIA टीम मुंबईत दाखल, मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी होणार?

एनआयए गुन्हे शाखेकडे तपासासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करु शकते. | NIA explosive car

NIA टीम मुंबईत दाखल, मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी होणार?
सीसीटीव्ही फुटेजमधये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्याचे निष्पन्न झाले होते.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाकडून अँटिलिया निवासस्थानाबाहेरील (Anitlia) सुरक्षारक्षकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय, हे पथक हिरेन मनसुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेईल, असेही सांगितले जात आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे हे पथक मंगळवारी मुंबईत दाखल झाले. या पथकात पोलीस महासंचालक (IG) दर्जाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे समजते. या पथकाने कालच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्याकडून तपासाची प्राथमिक माहिती घेण्यात आली.

आतापर्यंत हा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे होता. त्यामुळे आता एनआयए गुन्हे शाखेकडे तपासासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करु शकते. मात्र, इथून पुढे एनआयए स्फोटके अंबानींच्या घरापर्यंत आलीच कशी, याचा माग काढण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहावे लागेल.

अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी ‘त्या’ ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांकडून या घटनेचा सध्या कसून तपास केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणात सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. (Explosive car found outside residence of Mukesh Ambani)

आता मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कार सोडणाऱ्या व्यक्तीविषयी आणखी एक माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी इनोव्हा गाडीच्या चालकाने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये या ड्रायव्हरचा चेहरा दिसू शकला नाही.

ही इनोव्हा गाडी दोनदा मुंबईत आली होती. दोन्ही वेळेला ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात गेली होती. त्यामुळे पोलीस आता या माहितीच्याआधारे याप्रकरणाचे आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासत आहेत.

संबंधित बातम्या:

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा

मनसुख हिरेनप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यामागे काळंबेरं, आम्ही पोलखोल करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

(Explosive car found outside residence of Mukesh Ambani)

Published On - 9:54 am, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI