AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विमानतळावर नमाज पठण का नाही? राज्य सरकारने थेट कारण सांगितले

मुंबई विमानतळाबाहेर चालकांसाठी नमाज पठणाचे शेड उभारण्यास सुरक्षेच्या कारणास्तव राज्य सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट नकार दिला आहे.

मुंबई विमानतळावर नमाज पठण का नाही? राज्य सरकारने थेट कारण सांगितले
Mumbai Airport Namaz ban
| Updated on: Feb 27, 2026 | 10:33 AM
Share

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) परिसरात ऑटो, टॅक्सी आणि ओला-उबर चालकांसाठी नमाज पठणासाठी तात्पुरती शेड उभारण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. आता मागणीची मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर नोंद घेतली आहे. या मागणीला राज्य सरकारने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने सुरक्षेचे कारण देत विमानतळ परिसरात अशी कोणतीही तात्पुरती रचना उभारता येणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगत नकार दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई विमानतळ परिसरात शेड उभारून नमाज पठणाची परवानगी मिळावी, यासाठी ऑटो-टॅक्सी, ओला-उबर मेन्स युनियनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रमजानचा महिना आणि इतर दिवसांत प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या चालकांना नमाज पठणाची सोय व्हावी, हा यामागचा उद्देश होता.

विमानतळाच्या बाहेर नमाज पठणासाठी विशेष शेड उभारण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी राज्य सरकारने उच्च न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात सरकारने स्पष्ट केले आहे की, रमजान महिना असो किंवा इतर कोणतेही विशेष दिवस विमानतळ हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. त्यामुळे तिथे सुरक्षेच्या कारणास्तव अशी व्यवस्था करणे शक्य नाही. विमानतळावरील सुरक्षितता आणि सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने ही मागणी मान्य करणे योग्य नाही, असे सरकारने न्यायालयात सांगितले. त्यामुळे, चालकांच्या या मागणीला सरकारने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

राज्य सरकारची ठाम भूमिका

न्यायालयात राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी याबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. विमानतळ परिसर हा अत्यंत संवेदनशील आणि उच्च सुरक्षा क्षेत्र आहे. नमाज पठणासाठी दिवसातून पाच वेळा साधारण १,५०० ते २,००० लोक एकत्र येऊ शकतात. या गर्दीमुळे लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. विमानतळ आणि परिसराच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या जनसमुदायाची सुरक्षा राखणे कठीण आहे, असे ज्योती चव्हाण यांनी सांगितले.

राज्य सरकारने जरी यासाठी सरकारने परवानगी नाकारली असली, तरी न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि फिरदौस पुनीवाला यांच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना आणि MMRDA ला सुरक्षेशी तडजोड न करता विमानतळ परिसरात नमाजसाठी दुसरी पर्यायी जागा शोधता येईल का, याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने युनियनच्या मागण्यांचा विचार करताना मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला सरकारला दिला होता. तसेच यावेळी रमजान महिन्यापुरती तात्पुरती परवानगी देऊन नंतर जागा पूर्ववत करण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली होती.

जवळच्या मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करू शकतात

यावर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे वकील विक्रम नानकाणी यांनी युक्तिवाद केला की, प्रस्तावित जागेजवळच तीन मशीद उपलब्ध आहेत. यातील पहिली मशीद ही १ किलोमीटर अंतरावर म्हणजेच १३ मिनिटे पायी अंतरावर आहे. तर दुसरी मशीद ही १.३ किलोमीटर अंतरावर (१८ मिनिटे पायी अंतर) आणि तिसरी मशीद ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे. या सर्व मशीदचे अंतर जवळ असून या चालकांकडे स्वतःची वाहने आहेत. त्यामुळे ते सहजपणे जवळच्या मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करू शकतात, असा युक्तीवाद यावेळी करण्यात आला.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report