Mumbai Bandra News : वांद्रेमध्ये दुमजली इमारत कोसळली, एक ठार, 16 जखमी

Mumbai Building Collapse : याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्यात.

Mumbai Bandra News : वांद्रेमध्ये दुमजली इमारत कोसळली, एक ठार, 16 जखमी
दुर्घटनेत एकाचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:33 AM

मुंबई : मुंबईतून (Mumbai Breaking News) मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत मध्यरात्री वांद्रे (Bandra Building Collapse) येथे दुमजली इमारत कोसळली. शास्त्री नगर मधील एक दुमजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्यात. बीएमसी (BMC) व पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी होते. या दुर्घटनेत सोळा जण जखमी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी व तसेच पोलीस आयुक्त मंजुनाथ शिगें उपस्थित होते.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये बिहारहून आलेले सर्व मजूर राहत होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर सध्या 16 जण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

आदित्य ठाकरे यांचं ट्वीट :

तातडीने बचावकार्य

काही जण दबले गेल्याची भीती

वांद्रे पश्चिम भागातील शास्त्री नगर भागात असलेली ही इमारत तळमजला अधिक दोन मजले अशी होती. काही जखमींना रुग्णालयात दाखळ करण्यात आलं असल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बीएमसीकडून ही माहिती देणात आली. तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली दबले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री 2 वाजता केलेल्या ट्वीटनुसार, या ठिकाणी तत्काळ बचावकार्य करण्यात करण्यास सुरुवात झाली. सध्या जखमींना रुग्णालयात दाखळ करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

इमारत कोसळण्याची घटना याधीही वांद्रेमध्ये घडलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा दुमजली इमारत कोसळली असल्याने मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तर इमारतीमधील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. ऐन मान्सूनच्या तोंडावर घडलेल्या या घटनेनं मुंबईतील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आलाय. अशातच पालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यानं यावरुन राजकारणही तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.