AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना; भाजपची घोषणा

चिपळूणमधील पूरग्रस्त महिलेने आमदार आणि खासदारांचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. (mumbai bjp corporator)

मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांना; भाजपची घोषणा
bmc
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 3:11 PM
Share

मुंबई: चिपळूणमधील पूरग्रस्त महिलेने आमदार आणि खासदारांचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. या महिलेच्या मागणीची भाजपने गंभीरपणे दखल घेत मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी तसे लेखी पत्र महापौर आणि महापालिका चिटणीसांना दिलं आहे. (mumbai bjp corporator to donate one month salary to flood relief fund)

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटुंबियांना उभं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. राज्यात कुठेही आपत्ती उद्भवल्यास भाजपच्या वतीने पुनर्वसनासाठी तातडीने मदत पोहोचवण्यात येते. या पार्श्वभूमीवर तातडीने भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यासंबंधीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले आहे.

काय म्हणाली होती महिला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल चिपळूण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पुराची पाहणी करतानाच व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, असा टाहोही या महिलेने फोडला. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

होतं नव्हतं सर्व गेलं…

यावेळी काही व्यापाऱ्यांनी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं. असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1 (mumbai bjp corporator to donate one month salary to flood relief fund)

संबंधित बातम्या:

VIDEO: काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो

VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मृतदेह बाहेर काढणं महत्त्वाचं, राजकारण वा टीका करण्याची वेळ नाही: देवेंद्र फडणवीस

(mumbai bjp corporator to donate one month salary to flood relief fund)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.