AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC च्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष, कोव्हिड ते कोस्टल रोड, कोणते महत्वाचे निर्णय अपेक्षित?

Mumbai BMC 2021 Budget : महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

BMC च्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष, कोव्हिड ते कोस्टल रोड, कोणते महत्वाचे निर्णय अपेक्षित?
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
| Updated on: Feb 02, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : देशाच्या बजेटनंतर आता आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुंबई महापालिकेचे आर्थिक बजेट उद्या (बुधवार 3 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mumbai BMC 2021 Budget )

कोव्हिड संकटामुळे मुंबईकरांचं कंबरडं मोडलं आहे. महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळेच जाहिरातदार, हॉटेल, बिल्डरांना प्रिमियमध्ये सूट देण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईकरांवरील करवाढही यावर्षी टळण्याची शक्यता आहे. आर्थिक सक्षमीकरणासाठी पालिका कोणत्या उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिजोरीत आवक कमी आणि खर्च जास्त

दुसरीकडे, गेलं आर्थिक वर्ष कोव्हिडमध्ये गेल्यामुळे अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ 25 ते 30 टक्के महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. यंदा महापालिकेच्या तिजोरीत आवक कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे मुंबईकरांवर कराचा बोजा लादला जाणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता

500 स्क्वेअर फुटांपर्यंत घरांचा केवळ सर्वसाधारण कर माफ झाला आहे. त्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ केला जावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरवर्षी बजेटमध्ये साधारण 8 ते 10 टक्क्यांची वाढ होते. यंदाही बजेटचा आकडा आठ ते दहा टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेने मांडला होता.

उत्पन्न वाढीचे नवे मार्ग शोधले जाण्याची शक्यता

घनकचरा व्यवस्थापन आणि इतर सेवांसाठी अतिरिक्त कर लावला जाण्याची शक्यता आहे. भूमिगत टाक्या, अद्ययावत शिक्षण, कोस्टल रोड यांचा या अर्थसंकल्पात समावेश असेल. कोरोनासारख्या संकटाच्या अनुभवावरुन हेल्थ बजेट 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोस्टल रोड, मिठी नदी पर्यटन आणि पालिका शाळांमध्ये सीबीएसई-आयसीएसई बोर्डाच्या माध्यमातून अद्ययावत शिक्षणावर भर दिला जाण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार का?

पूरमुक्तीसाठी भूमिगत टाक्या, माहुल आणि मोगरा ही नवी पंपिंग स्टेशन्स, मिठी नदी सौंदर्यीकरण असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते. मात्र मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाट्याने प्रसार वाढल्याने लॉकडाऊन जाहीर झाल्याचा फटका अनेक योजनांना बसला. या वर्षात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार का, याकडे लक्ष आहे.

शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडसाठी पुन्हा भरीव तरतूद केली जाईल. कोस्टल रोडचे काम 2023 पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार असल्यामुळे यासाठी मोठी तरतूद केली जाईल. याशिवाय सुरक्षित मुंबईसाठी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करणे, मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवणे, मिठी नदीचे सौंदर्यीकरण-बोटिंग, नद्यांचे पुनरुज्जीवन, फ्लड गेट वाढवणे यासह दर्जेदार सिमेंटचे रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. (Mumbai BMC 2021 Budget )

‘बेस्ट’ला आर्थिक मदत

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणार्‍या ‘बेस्ट’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत सुमारे अडीच हजार कोटींची मदत केली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच 1500 कोटींची मदत करण्यात आली. त्यामुळे यावर्षीही ‘बेस्ट’ला आर्थिक बळ देण्यासाठी मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

महत्वाचे निर्णय अपेक्षित

– कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात साथजन्य आजारांसाठी विशेष रुग्णालये. – पालिकेचे दवाखाने संध्याकाळच्या वेळेतही सुरुच राहणार – अतिवृष्टीत पावसाचे पाणी साचवण्यासाठी भूमिगत टाक्या – नद्यांचे सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग – समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी तरतूद – सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा सुरु करणे – स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी कचर्‍याची विल्हेवाट प्रकल्प, कचर्‍यापासून वीज प्रकल्प – पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम – उत्पन्न वाढीसाठी कर्जरोखे तयार करणे – पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी, सीसीटीव्ही कॅमेरे

संबंधित बातम्या :

 टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

सफरचंद ते मद्यपान, सेस लागू, काय स्वस्त, काय महाग?

(Mumbai BMC 2021 Budget )

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.