मुंबई मनपाच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाची सोय जवळच्या हॉटेलात

मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी हे मुंबई बाहेर राहतात. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाच्या कामासाठी कार्यरत (BMC Employee stay in hotel) आहेत.

मुंबई मनपाच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाची सोय जवळच्या हॉटेलात
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 9:33 AM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी हे मुंबई बाहेर राहतात. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाच्या कामासाठी कार्यरत (BMC Employee stay in hotel) आहेत. कोरोनासाठी काम करत असल्याने कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते आणि त्यामुळे तो राहत असलेल्या भागातही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मुंबई बाहेरील इतर शहरातील महापालिकेने मुंबई महापालिकेवर नाराजी व्यक्त करत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच करा, असं सांगण्यात आले आहे. यानंतर मुंबई महापालिकेनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय घेतला (BMC Employee stay in hotel) आहे.

मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी हे मुंबई बाहेर राहतात. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल ट्रेन बंद आहेत. त्यासोबत पर्यायी वाहतुकीची व्यवस्थाही नसल्याने कर्मचारी तारेवरची कसरत करत कार्यालय गाठत आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांची वेळ वाया जातो. त्यासोबत कर्मचारी राहत असलेल्या इमारतीमधील लोकांकडूनही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच प्रवासादरम्यानही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. या सर्व पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, घनकचरा विभागाचे सफाई कामगार, अधिकारी, सुरक्षा विभाग, अग्निशमन दल, अभियंते हे सर्व दररोज कामावर येत असतात. यातील अनेकजण मुंबई बाहेर राहत आहे. त्यांना लॉकडाऊन दरम्यान कामावर पोहोचण्यासही वेळ लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलमधील एका खोलीत दोन व्यक्ती राहतील. तसेच पंचतारांकित हॉटेलसाठी प्रति दिन दोन हजार, 4 तारांकित हॉटेलसाठी प्रतिदिन एक हजार 500, तीन तारांकित हॉटेलसाठी एक हजार, विना तारांकित हॉटेल असल्यास प्रति दिन 500 असा दर निर्धारित करण्यात आला आहे. या रकमेत दोन व्यक्तींच्या निवासासह न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण आणि लॉन्ड्री सर्व्हिसचा समावेश आहे, असं सहाआयुक्त रमेश पवार यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था सरकारने मुंबईतच करावी

“मुंबईमध्ये काम करणारे आणि नवी मुंबईत राहणारे कर्मचारी कामासाठी रोज प्रवास करत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत रुग्ण वाढत आहेत. मुंबईमध्ये जे कुणी काम करत आहेत त्यांची राज्य सरकारने तिथे राहाण्याची व्यवस्था करावी नाहीतर नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते”, असं बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही काहीदिवसांपूर्वी सांगितले होते.

संबंधित बातम्या : 

धारावीत अन्नवाटप करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

Corona | ‘कोरोना’शी लढण्यासाठी महापालिका सज्ज, मुंबई-पुण्यात घरोघरी सर्वेक्षण

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.