मुंबईकरांसाठी गरज असेल तिथे व्यवस्था, वरळी, कांजूरसह अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरसह, ICU बेडची सोय

मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे," असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. (BMC Increase beds in Covid Center)

मुंबईकरांसाठी गरज असेल तिथे व्यवस्था, वरळी, कांजूरसह अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरसह, ICU बेडची सोय
Corona beds
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 3:42 PM

मुंबई : “मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत आहेत. जनतेचा जीव वाचवणं गरजेचं आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी बेडची संख्या वाढवली जात आहे. मुंबईत काल रेल्वेचे 2800 बेड वाढण्यात आले आहेत. तर वरळीतील NSCI मध्येही बेडसह, व्हेंटिलेटर, ICU तसेच इतर व्यवस्था वाढवली जात आहे. वरळीत तब्बल दोन ते अडीच हजार बेड वाढवले जाणार आहेत. त्याशिवाय कांजूरमध्ये बेडची संख्या वाढवली जात आहे,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Mumbai BMC Increase beds in Various Covid Center Said Mayor Kishori Pednekar)

मुख्यमंत्री हिताचा निर्णय घेतील

“काल झालले्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री आणि इतर सर्वच नेते उपस्थित होते. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घ्यायचा याचा विचार केला जात आहे. जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यायचा आहे. जनतेचा जीव वाचवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री हिताचा निर्णय घेतील. मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे,” असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

नागरिकांनी विनाकारण वेळ घालवू नये

“मुंबईत काल 50 जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे धोक्याची घंटा वाढत आहे. जिथे गरज असेल, तिथे व्यवस्था उभारली जातं आहे. नागरिकांनी विनाकारण वेळ घालवू नये. जिथे बेड मिळेल तिथे दाखल व्हा,” अशी सूचना मुंबईच्या महापौरांनी केली आहे.

“आज बचेंगे तो और भी लढेंगे, राजकारण नंतर करता येईल. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती जरी चांगली नसली तरी याबाबतची तयारी ठेवावी लागेल,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

एकावेळी 10 ते 12 जणांना ऑक्सिजन पुरवठा

“मुंबईत पुन्हा गेल्यावर्षीसारखी तयारी करतो आहे. दातृत्व करणाऱ्या लोकांना विनंती करते. सर्वांना सढळ हस्ते मदत करा. पालिकेच्या लिपिक पदासाठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मीही पत्र आयुक्तांना दिलं आहे. परीक्षा रद्द करणे जास्त गरजेचं आहे. अंतर्गत परीक्षा असल्याने त्या नंतरही घेता येतील,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

“सेंट्रल O2 ही सुविधा महापालिकेनं सुरु केली आहे. यामुळे एका वॉर्डमध्ये एकावेळी 10 ते 12 जणांना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो. तसेच महापालिकेने ऑक्सिजन लिक्विड प्लांट उभारले आहेत. मुंबईत ताटाला लोणचं लावतात त्याप्रमाणे लस दिली जाते आहे. एकीकडे भूतानला शेजारधर्म म्हणून लस देता आणि देशाला उपाशी ठेवतात,” अशी टीका ही त्यांनी केंद्र सरकारवर केली. (Mumbai BMC Increase beds in Various Covid Center Said Mayor Kishori Pednekar)

संबंधित बातम्या : 

Coronavirus: महाराष्ट्रात टंचाई असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं भाजप कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा आरोप

Maharashtra Lockdown: मुंबईतील दुकानं बंद ठेवायचेत, तर आर्थिक पॅकेज द्या; अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही: विरेन शाह

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.