Coronavirus: महाराष्ट्रात टंचाई असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं भाजप कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा आरोप

Coronavirus: महाराष्ट्रात टंचाई असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं भाजप कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा आरोप
shortage corona drug remedicivir

शेजारच्या गुजरातमधील भाजपच्या कार्यालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स मोफत वाटण्यात आली. | BJP free distrubution of remdesivir injection

Rohit Dhamnaskar

|

Apr 11, 2021 | 12:49 PM

मुंबई: गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा (Remdesivir injection) सध्या महाराष्ट्रात प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या इंजेक्शन्सचा काळाबाजार सुरु असून त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहेत. मात्र, त्याचवेळी शेजारच्या गुजरातमधील भाजपच्या कार्यालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स मोफत वाटली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. (BJP distributing remdesivir injection free in Surat says Nawab Malik)

देशामध्ये रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे. हे राजकारण नाही तर काय आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी ट्विटवरून उपस्थित केला. त्यामुळे आता भाजपकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

महाराष्ट्राला दर दिवशी 50 हजार रेमडेसिव्हीरचा पुरवठा, केंद्राने इंजेक्शनसाठी मदत करावी

महाराष्ट्रात दर दिवसाला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने या सर्वांचा वापर होत आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्याशिवाय सर्व खाजगी डॉक्टरांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर हा टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमानुसार करा, असा सल्लाही राजेश टोपेंनी दिला होता.

‘नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा’

काही ठिकाणी रेमडेसिव्हीरचा भाव 3 ते 4 हजार रुपये केला जात आहे. ते इंजेक्शन 1100 ते 1400 च्या वर विकू नका, असं ठरवलं होतं. पण त्याचं पालन केलं जात नसल्याचं दिसून आलं. यासाठी आम्ही एक समिती नेमली आहे ती रेमडेसिव्हीर इंजेक्शनची योग्य ती किंमत ठरवेल. त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा, अशी माझी कळकळीची विनंती असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले होते.

रेमडेसिव्हिरसाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम

राज्यात करोना लस, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. अशावेळी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता जिल्हास्तरावरच कंट्रोल रूमची उभारणी केली जाणार आहे.

जिल्हा पातळीवर समिती जिल्हा स्तरावर एक तांत्रिक समिती गठीत करून त्यामार्फत विशिष्ट पद्धतीने खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हीरचा उपयोग व्यवस्थित होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.

(BJP distributing remdesivir injection free in Surat says Nawab Malik)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें