कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाखांची मदत, मुंबई पोलीस आयुक्तांची घोषणा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाखांची मदत, मुंबई पोलीस आयुक्तांची घोषणा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी 65 ते 70 लाख रुपयांची आर्थिक (Mumbai CP on Corona Maharashtra police death) मदतीची घोषणा केली आहे.

Namrata Patil

|

May 07, 2020 | 5:14 PM

मुंबई : राज्यात पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 500 वर जाऊन (Mumbai CP on Corona Maharashtra police death) पोहोचला आहे. तर दुसरीकडे 6 पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी 65 ते 70 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस अहोरात्र मेहनत घेत (Mumbai CP on Corona Maharashtra police death) रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलिसांनाही विळखा घातला आहे. राज्यात आतापर्यंत मुंबईत 3, पुणे 1 आणि सोलापूरमध्ये एक अशा 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल.

कोरोनामुळे दूर राहणाऱ्या पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड रुग्णालयात रुपांतर केले आहे. या ठिकाणी जवळपास 300 बेडची व्यवस्था केली गेली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढती 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर पोहोचला आहे. आज (7 मे) 36 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काल (6 मे) 38 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. गेल्या दोन दिवसात राज्यातील 74 पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले आहे.

राज्यातील 531 कोरोनाबाधितांमध्ये 51 अधिकारी आणि 480 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात कोरोनाची लक्षण आढळणाऱ्या सर्वाधिक पोलिसांचा समावेश आहे. राज्यातील जवळपास 43 अधिकारी आणि 444 पोलीस कर्मचारी अशा एकूण 487 पोलिसांना कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत.

सुदैवाने आतापर्यंत 39 कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात 8 अधिकारी आणि 31 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान कोरोनाबाधित पोलिसांचे प्रमाण फार कमी (Mumbai CP on Corona Maharashtra police death) आहे.

संबंधित बातम्या : 

सोलापुरात कोरोनाविरोधात लढताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें