फेसबुकवरुन ओळख, हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तरुणीची मुंबईत गळा दाबून हत्या

फेसबुकवरुन ओळख, हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तरुणीची मुंबईत गळा दाबून हत्या
तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक

इशिता कंजूर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून आरोपी बिपीनला हत्येनंतर अवघ्या 12 तासात गुन्हे शाखेने अटक केली. (Bandra Girlfriend boyfriend Honey Trap)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 01, 2021 | 3:28 PM

मुंबई : फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवणाऱ्या तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला मुंबईच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. प्रेमसंबंधात गुंतवून हनी ट्रॅपमध्ये अडकवत तरुणीने आरोपीकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी बिपीन विनोद कंडूलना हा वांद्रे परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला होता. इशिता कंजूर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून आरोपी बिपीनला हत्येनंतर अवघ्या 12 तासात गुन्हे शाखेने अटक केली. (Mumbai Crime News Bandra Girlfriend killed while trying to catch boyfriend in Honey Trap)

बलात्काराच्या खोट्या तक्रारीची धमकी

फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर संबंधित तरुणीने आरोपी बिपीन विनोद कंडूलना याच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. मात्र काही दिवस उलटल्यानंतर तरुणी आरोपी तरुणाकडे वारंवार पैशांची मागणी करु लागली. दीड लाख रुपये दे अन्यथा मी पोलीस ठाण्यात तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार देऊन गुन्हा दाखल करेन, अशी धमकी तरुणी आरोपी बिपीनला देत होती.

वारंवार होत असलेल्या पैशांच्या मागणीला कंटाळून आरोपीने तरुणीचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी रात्री इशिता आणि बिपीनमध्ये पैशांवरुन वाद झाला. बिपीनने इशिताची समजूत काढून आपण फिरायला जाऊ, असे सांगितले आणि तो तिला वांद्रे रिक्लेमेशन परिसरात घेऊन आला.

वांद्य्रात गळा दाबून हत्या

तिथे पुन्हा इशिता पैशांची मागणी करु लागली. एवढे पैसे त्याच्याकडे नसल्याचे बिपीन तिला वारंवार सांगत होता, मात्र ती ऐकायला तयार नव्हती. इशिताने पुन्हा त्याला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि स्वतःचे कपडे फाडून घेत ओरडू लागली. ती काहीच ऐकत नसल्याचे लक्षात येताच बिपीनने तिची गळा दाबून हत्या केली आणि तो तिथून पसार झाला.

सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासला सुरुवात केली. त्या दरम्यान आजूबाजूच्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता हे जोडपे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यानुसार चौकशी करुन, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी बिपीनला पोलिसांनी अटक केली.

गुन्हे शाखा 9 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आरोपीला 12 तासात अटक केली. आरोपी आणि मृत महिला हे मूळचे झारखंडचे रहिवाशी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये हनी ट्रॅपचं सत्र सुरुच, क्लास वन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ काढून 3 कोटी मागितले

लॉजवर भेट, बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत 20 लाखांची मागणी, मुंबईत हनी ट्रॅप

(Mumbai Crime News Bandra Girlfriend killed while trying to catch boyfriend in Honey Trap)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें