AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिसमध्ये काम करत होते अन् तेवढ्यात… मुंबईतील तरुणांवर मध्यरात्री ओढवला काळ, नेमकं काय घडलं?

मुंबईच्या चांदिवलीतील साकीविहार रोडवरील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ऑफिसमध्ये काम करत होते अन् तेवढ्यात... मुंबईतील तरुणांवर मध्यरात्री ओढवला काळ, नेमकं काय घडलं?
mumbai fire
| Updated on: Jan 08, 2026 | 11:29 AM
Share

मुंबईत एका बाजूला राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे अंधेरीतील एका व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. अंधेरी पूर्व परिसरातील साकीविहार रोडवर असलेल्या एका व्यावसायिक इमारतीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. नारायण प्लाझा असे चांदिवली परिसरातील इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे लाखो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई अग्निशमन दलाला बुधवारी सायंकाळी ६:३६ च्या सुमारास साकीविहार रोडवरील नारायण प्लाझा या चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर येत असल्याची माहिती मिळाली होती. नारायण प्लाझा या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नियोसेल इंडस्ट्रीज (युनिट क्र. ३०३) या कंपनीत आग लागली होती. या कार्यालयातील फर्निचर आणि ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण मजल्यावर दाट धूर पसरला होता. आता घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने सायंकाळी ६:५४ वाजता याला लेव्हल-१ ची आग घोषित केले.

यावेळी अग्निशमन दलाने तातडीने इमारत रिकामी केली. या बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांना कार्यालयात दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा अंत झाला. भगवान पिटले (३०) यांना सेवन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले, तर सुमंत जाधव (२८ वर्ष) यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाट धुरामुळे श्वास गुदमरल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शॉर्ट सर्किटमुळे आग?

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, ही आग सुमारे १५०० चौरस फूट परिसरात पसरली होती. आगीत कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी फर्निचर, फॉल्स सीलिंग, लिथियम-आयन बॅटरी आणि महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्या. लिथियम बॅटरीमुळे आग विझवण्यात अडथळे येत होते, मात्र शर्थीच्या प्रयत्नांनंतर रात्री उशिरा आग आटोक्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला.
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान.
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात.
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप.
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....