AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे मुंबईला येतातयेत, पण…; शिंदे सरकारमधील मंत्र्याचं आवाहन काय?

Girish Mahajan on Manoj Jarange Patil Maratha Reservation Andolan : असंख्य मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरु आहे. अशात शिंदे सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे. हे आवाहन नेमकं काय आहे? वाचा सविस्तर...

मनोज जरांगे मुंबईला येतातयेत, पण...; शिंदे सरकारमधील मंत्र्याचं आवाहन काय?
| Updated on: Jan 20, 2024 | 3:33 PM
Share

मुंबई | 20 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असंख्य मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईकडे येतो आहे. यावर राज्याचे ग्रामविकास आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना त्यांनी आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कुच केलीय. पण मराठा आरक्षण हे कायद्यानंच घ्यावं लागेल. आरक्षणाबाबतचं काम अंतिम टप्प्यात आहे. संयमानं घेतलं तर 100 % मराठा समाजाला आरक्षण मिळेल. टिकणारं आरक्षण मराठा मिळायला हवं. त्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे, असं गिरीश महाजन म्हणालेत.

गिरीश महाजन म्हणाले…

रोजगार निर्मीती आणि मुंबईची ओळख नव्यानं निर्माण करण्याकरता महामुंबई एक्स्पो सारखा कार्यक्रम आयोजित केला जातोय. नऊ दिवस हा कार्यक्रम मुंबईत होईल. क्रिकेटपटू देखील या ठिकाणी येणार आहेत. यातून मुंबईच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. महा मुंबई एक्स्पोचं तिकीट 150 रुपये आहे. हे मला माहित नव्हतं. याबाबत आयोजकांशी बोलतो, असंही गिरीश महाजन म्हणालेत.

ठाकरेंवर निशाणा

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमधील काळाराम मंदिरात पूजा केली जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित असणार आहेत. यावरही गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. त्यांचा पक्ष त्यांना वाढवायचाय. त्यामुळे त्यांनी काळाराम मंदिरात जातायेत. त्यांनी इतरही कोणत्याही मंदिरात जावं, असं गिरीश महाजनांनी म्हटलं.

संजय राऊतांना आव्हान

संजय राऊत यांनी आज सकाळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावरून गिरीश महाजनांनी पलटवार केला आहे. सकाळी-सकाळी उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत बसतात. आपली पात्रता आहे का तेवढी? नरेंद्र मोदी इथे येतायेत. तुम्ही तुमच्या नेत्यांना बाहेर काढा ना…, असं आव्हान महाजांनी संजय राऊतांना दिलंय.

काहीही झालं तरी आक्षेप घेणं, ही विरोधकांची रीत आहे. ते दावोस बद्दल बोलतीलच. दावोस च्या MOU क्लिअर आहेत. आम्ही त्या दाखवायला तयार आहोत, असंही गिरीश महाजन म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.