मुंबईच्या KEM रुग्णालयात 5 कोटींचा घोटाळा?; रुग्णालयाच्या खात्यातील पैसे वळवल्याचा आरोप

मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. (Mumbai KEM hospital 5 crore scam)

मुंबईच्या KEM रुग्णालयात 5 कोटींचा घोटाळा?; रुग्णालयाच्या खात्यातील पैसे वळवल्याचा आरोप
kem hospital
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 12:03 PM

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण तडफडत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी या काळात कोट्यावधींचे गैरव्यवहार होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी एका अकाऊंटटला पोलिसांनी अटक केली आहे. राजन राऊळ असे या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी श्रीपाद देसाई या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. (Mumbai KEM hospital 5 crore scam allegations of diverting money from hospital accounts)

केईएम रुग्णालयात मोठा गैरव्यवहार 

मुंबईतील परळमधील के. ई. एम रुग्णालय हे फार प्रसिद्ध आहे. या के. ई. एम रुग्णालयात अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. कमी खर्चात किंवा माफक दरात या ठिकाणी उपचार मिळत असल्याने अनेक रुग्णही या ठिकाणी गर्दी करतात. मात्र याच के.ई.एम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला आहे. याप्रकरणी एका अकाऊंटटला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

केईएममध्ये झालेला हा घोटाळा तब्बल 5 कोटी 23 लाख 96 रुपयांचा आहे. यात दोन आरोपींचा समावेश आहे. हे आरोपी संस्थेतील माजी अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करायचे. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या खात्यातून हे पैसे स्वत:च्या मालकीच्या नावे असलेल्या कंपनीच्या नावे वर्ग करायचे. फक्त कंपनीतच नाही तर इतर खात्यांमध्येही त्यांनी हे पैसे वळवल्याचे तपासात समोर आले आहे. सेठ गोवरधन सुंदरदस मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाच्या अकाऊंटमध्ये हा घोटाळा झाला आहे.

एकाला अटक

या प्रकरणी के.ई.एमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केईएममध्ये झालेला हा घोटाळा तब्बल 5 कोटी 23 लाख 96 रुपयांचा आहे. या घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजन राऊळ असे या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी श्रीपाद देसाई या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. (Mumbai KEM hospital 5 crore scam allegations of diverting money from hospital accounts)

संबंधित बातम्या : 

राज्यात 33 टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण, कोणत्या वयोगटातील किती जण?

महाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नाही, त्यामुळे देशपातळीवर उत्तम काम : राजेश टोपे

मुंबईकरांनो आता एका क्लिकवर होणार कार पार्किंगचे बुकींग, नेमकी सुविधा काय?

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.