AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो उद्या पावण्यारावळ्यांकडे जाताना एकदा ही बातमी वाचा, ‘या’ मार्गावर साडे 14 तासांचा जम्बो ब्लॉक, पाहा वेळापत्रक

मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र आता या प्रवाशांना शनिवारी सायंकाळी आणि रविवारी त्रासाचा सामना करावा लागणार आहे. कारण एका मार्गावर साडे 14 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे.

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो उद्या पावण्यारावळ्यांकडे जाताना एकदा ही बातमी वाचा, 'या' मार्गावर साडे 14 तासांचा जम्बो ब्लॉक, पाहा वेळापत्रक
Mega Block
| Updated on: Sep 13, 2025 | 5:53 PM
Share

मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र आता या प्रवाशांना शनिवारी सायंकाळी आणि रविवारी त्रासाचा सामना करावा लागणार आहे. हार्बर मार्गावर तब्बल साडे 14 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होणार आहे. हा ब्लॉक कधी आणि कोणत्या कामासाठी घेतला जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हार्बर मार्गावर साडे 14 तासांचा मेगाब्लॉक

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळक नगर या स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.30 तास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

नवीन मार्गिकेचे काम केले जाणार

हार्बर मार्गावरील हा मेगा ब्लॉक शनिवारी रात्री 11.05 ते रविवारी दुपारी 1.35 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात हार्बर मार्गावरील वडाळा रोड – मानखुर्द दरम्यान नव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. या काळात वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकलसेवा बंद राहणार आहे.

अनेक लोकल रद्द

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10.20 ते रविवारी दुपारी 2.19 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शनिवारी रात्री 10.07 वाजल्यापासून रविवारी दुपारी 12.56 वाजेपर्यंत पनवेलवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे.

मध्य रेल्वेवरही ब्लॉक

मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गांवर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील 18 मेल-एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहे.

पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर रविवारी मध्यरात्री 00.30 ते पहाटे 4.30 या काळात ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या राममंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. तसेच ब्लॉकच्या कालावधील काही गाड्या रद्द केल्या जाणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.