AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local : मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लवकरत लवकर ही अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

Mumbai Local : मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!
mumbai localImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2026 | 4:41 PM
Share

Mumbai Local Late : लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. ही लोकल एक मिनिट जरी उशिरा आली तर हजारो लोकांना त्यांच्या ऑफिसला पोहोचायला वेळ होतो. त्यामुळेच लोकलचे वेळापत्रक कोलमडणे हे न परवडणारे आहे. दिवसभर लोकल रेल्वे वेळेवर धावाव्यात यासाठी संपूर्ण यंत्रणा दिवसभार काम करत असते परंतु तरीदेखील कुठेतरी अडचण येतेच. आजदेखील मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लवकरत लवकर ही अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

नेमका काय बिघड झाला?

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. तब्बल अर्ध्या तासापासून वाहतूक सेवा विस्कळीत झालेली आहे. सीएसएमटीच्या बाहेर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या जाणवत आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा  15  ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहे. सिग्नलमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी कर्मचारी वेगाने काम करत आहेत.

दादर, सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

अर्धा तास होऊनही सीएसएमटीवर लोकल रखडलेल्या असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आता कार्यालये सुटण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे चाकरमानी आपापल्या घरी निघण्यासाठी सीएसएमटी, दादर अशा स्टेशनवर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. असे असताना सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने आता चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी घाबरू नये, प्रवासादरम्यान काळजी घ्यावी

दरम्यान, आम्ही सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लवकरत लवकर ही समस्य दूर करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये. लोकल 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. तिथे लोकलच्या वेळापत्रकात बदल झालेला नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...