वाघाच्या बछड्याचे “वीरा ” तर हम्बोल्ट पेग्विनच्या पिलाचे “आँस्कर” नामकरण, राणीच्या बागेत महापौरांनी केक कापला

वाघाच्या बछड्याचे वीरा  तर हम्बोल्ट पेग्विनच्या पिलाचे आँस्कर नामकरण, राणीच्या बागेत महापौरांनी केक कापला
हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने 18 ऑगस्ट 2021 रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव “आँस्कर ” असे ठेवण्यात आले आहे. या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते केक कापून नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले.

राणी बागेतील मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव "वीरा" असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने 18 ऑगस्ट 2021 रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव "आँस्कर " असे ठेवण्यात आले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 18, 2022 | 2:30 PM

मुंबई : राणीच्या बागेतील बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी 14 नोव्हेंबर 2021 रोजी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव “वीरा” असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने 18 ऑगस्ट 2021 रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव “आँस्कर ” असे ठेवण्यात आले आहे. या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते केक कापून नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाल्या की, सुमारे 15 वर्षानंतर12 फेब्रुवारीला औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन प्राणीसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर ) व करिष्मा ( मादी) मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आली.

नव्या पाहूण्यांसाठी खास व्यवस्था

वाघाकरिता नवीन तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये नैसर्गिक अधिवास निर्मिती धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, अनुकूल लँण्डस्केप इत्यादी तयार करण्यात आले असून या अत्यंत अनुकूल अश्या प्रदर्शनीमध्ये या बंगाल वाघाच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिला आहे. वाघीण करिष्मा व बछडा “वीरा” सुखरूप असून बछडा आता दोन महिन्याचे झाले आहे. वाघीण करिष्मा तिच्या बछडयाची व्यवस्थित काळजी घेत असून बछड्याची उत्तम वाढ होत आहे. अशी माहिती महापौरांनी दिली.

वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणार

” वीरा” सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे. पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली असून तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय, भायखळा येथील हम्बोल्ट पेग्विन कक्षातील डोनाल्ड (नर )व डेझी (मादी ) यांनी 1 मेला रोजी जन्म दिलेल्या नर पिल्लाचे नाव “ओरिओ ” असे ठेवण्यात आले होते, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : लातूरमध्ये रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी

नाना पटोलेंवर उपचारासाठी पुणे भाजपची 1 हजाराची मनी ऑर्डर! तर पटोलेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, बावनकुळे आक्रमक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें