AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई जिंकण्यासाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधणी; अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली बैठकांचे सत्र

आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. | MNS

मुंबई जिंकण्यासाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधणी; अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली बैठकांचे सत्र
आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत
| Updated on: Feb 08, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आतापासूनच कंबर कसली आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्या पक्षाच्या बैठका पार पडत आहेत. यामध्ये मनसेने महानगरपालिकेच्या निवडणुका स्वत:च्याच बळावर लढवाव्यात असा सूर व्यक्त होताना दिसत आहे. (MNS meetings for upcoming Mumbai Mahanagar Palika election)

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत. अमित ठाकरे स्वतः सगळ्या बैठकांना हजर असतात. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

मुंबईतील 227 जागांवर स्वतंत्रपणे लढा, मनसेच्या कार्यकर्त्यांची मागणी

या बैठकांमध्ये मनसेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सूर उमटताना दिसत आहे. पालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागांवर स्वतंत्रपणे लढावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कार्यकर्त्यांची ही भावना राजसाहेबांपर्यंत पोहोचवू. पण अंतिम निर्णय तेच घेतील, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

अमित ठाकरेंचा प्रभाव वाढणार: संदीप देशपांडे

अमित ठाकरे यांच्यावर सध्या लोकसभेच्या एका जागेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे की, ते एका मतदारसंघापुरते मर्यादित राहणार नाहीत. आगामी काळात अमित ठाकरे यांचा प्रभाव सर्वच महानगरपालिकांमध्ये दिसून येईल, असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला.

शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना आणि भाजपने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या दोन घटना मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मनसेच्या भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठी गळती लागण्याची शक्यता होती. गेल्या आठवड्यात कल्यामधील मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश होता. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांच्या शिष्टाईमुळे या कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात यश आले.

संबंधित बातम्या:

राज ठाकरे मनसे कार्यालयात दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

(MNS meetings for upcoming Mumbai Mahanagar Palika election)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.