AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई मोकळा श्वास घेणार… फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात लावण्यास बंदी, महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई शहरातील फलकबाजीमुळे शहराचे वेंगळवाणे दृश्य दिसत असते. त्यावर आता अंकुश लावण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे बृहन्मुंबई क्षेत्रातील पदपथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही.

मुंबई मोकळा श्वास घेणार... फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात लावण्यास बंदी, महापालिकेचा मोठा निर्णय
file photo
| Updated on: Nov 27, 2025 | 9:45 PM
Share

मुंबई महानगरपालिका हद्दीतील जाहिरातींचे नियमन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५’ (पॉलिसी गाईडलाइन्स फॉर डिस्प्ले ऑफ आऊटडोअर अॅडव्हर्टाइजमेंट) जाहीर केली आहेत.दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ पासून ही मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहेत.जाहिरातदार,जाहिरात संस्था तसेच संबंधित सर्व घटकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे – २००८’ मध्ये सुधारणा करत २०२५ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मुंबई आणि उपनगरात क्षेत्रात ४० X ४० फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकास परवानगी दिली जाणार नाही. यापुढे पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास कोणतीही नवीन परवानगी दिली जाणार नाही.

डिजिटल जाहिरात फलकांची (डिजिटल होर्डिंग) प्रकाशमानता (ल्यूमिनन्स रेशिओ) ३:१ या गुणोत्तरापेक्षा अधिक ठेवता येणार नाही. तसेच, लुकलुकणाऱ्या (फ्लिकरिंग) जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी नसेल. मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स), वाणिज्यिक इमारती (कमर्शिअल बिल्डिंग), पेट्रोल पंप येथे एलईडी जाहिरात प्रदर्शित करता येईल. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या आणि दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणावर तसेच इमारतीच्या बाह्यभागावर व्यावसायिक आणि अव्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करता येतील.

हतूक पोलीसांची ‘ना हरकत’ लागणार

दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथमच एकेरी ( सिंगल ) आणि पाठपोट ( बॅक टू बॅक ) फलकांसोबतच ‘व्ही’ आणि ‘एल’ आकार तसेच त्रिकोणी ( ट्राय व्हिजन ), चौकोनी ( स्केअर व्हिजन ), पंचकोनी ( पेंटागॉन व्हिजन ), षटकोनी स्वरुपाच्या ( हेक्झागॉन व्हिजन ) जाहिरात फलकांना यापुढे परवानगी देण्यात येईल. याकरीता वाहतूक पोलीसांची ‘ना हरकत’ लागेल.

‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे – २०२५’

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्यामार्फत जाहिरातींना परवानगी देणे तसेच अनधिकृत जाहिरातींविरोधात कारवाई करण्याची कार्यवाही केले जाते. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३२८/३२८ (अ ) अंतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील जाहिरातींचे नियमन केले जाते. या पार्श्वभूमीवर, माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारसी तसेच नागरिकांच्या हरकती आणि सूचना विचारात घेऊन ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे – २०२५’ जाहीर करण्यात येत आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे सविस्तर स्वरुपात मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध करण्यात येत आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.