मार्च महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता, निवडणूक आयोगाच्या सूचना काय? वाचा सविस्तर

मार्च महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता, निवडणूक आयोगाच्या सूचना काय? वाचा सविस्तर
अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले 1 कोटी खर्च

मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Elections 2022) येत्या मार्च महिन्यात होण्यची शक्यता आहे. फक्त मुंबई महापालिकेचीच नाही तर राज्यातील इतर 14 महानगरपालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसेच 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका (Jilha Parishad Election) मार्च महिन्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस असल्याच्या चर्चा आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 21, 2022 | 3:39 PM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुबई महापालिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असतं. याच मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Elections 2022) येत्या मार्च महिन्यात होण्यची शक्यता आहे. फक्त मुंबई महापालिकेचीच नाही तर राज्यातील इतर 14 महानगरपालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसेच 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका (Jilha Parishad Election) मार्च महिन्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस असल्याच्या चर्चा आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर काय काळजी घ्यावी, यासंदर्भात निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुळे आता कोणत्याही निवडणुका थांबणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी याबाबत सूचना जारी केल्या आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भात काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? अगदी एखादा मतदार विनामास्क आला तरी ती परिस्थिती कशी हाताळावी यासंदर्भात माहिती यात देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

प्रभागरचनेचा आराखडा आयोगाकडे सादर

प्रभागरचनेतील लोकसंख्येबाबतही यात स्पष्टता देण्यात आली आहे. एका प्रभागात हजार ते दीड हजार लोकसंख्या असावी अशा सूचना निवडणू आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रभागरचनेचा आराखडा आधीच निवडणूक आयोगापुढे ठेवल्याने ही प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे. मुंबईतली प्रभागांची संख्या 227 वरून 236 वर गेली आहे. यावेळी काही राजकीय वादही दिसून आला. मुंबईतील नव्या वस्त्या, नव्या इमारती, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन ही प्रभागरचना करण्यात आली आहे. मुंबई काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच, पण त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीही आहे, त्यामुळे मुंबईत सर्वच राजकीय पक्ष जोर लावताना दिसून येत आहेत.

देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांनी वातावरण तापलं आहे. सर्वांचं लक्ष तिकडे आहे. काल, परवाच आलेल्या नगरपंचायतीच्या निकालांच्या तोफा अजून थंडावल्या नाहीत. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे बिगूल वाजल्याने पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मुंबईबरोबरच, पुणे, औरंगाबाद, नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्याता असल्याने ग्रामीण भागातही राजकारण तापणार आहे.

Why I Killed Gandhi: तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह; जयंत पाटलांचा आव्हाडांच्या सूरात सूर

Why I Killed Gandhi: भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?; शरद पवारांचा बोचरा सवाल

PHOTO: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, दिग्गज राजकीय नेते अन् कलाकारांची उपस्थिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें