शिवसेना आमदार सरनाईकांविरोधात तक्रार करणाऱ्या रमेश अय्यर यांच्यावर गुन्हा दाखल, ईडी आणि मुंबई पोलिसांमध्ये सामना?

मुंबई पोलिसांनी रमेश अय्यर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने मुंबई पोलीस विरुद्ध ईडी असा सामना होण्याची शक्यता आहे (Mumbai Police Charge sheet against Ramesh Iyer)

शिवसेना आमदार सरनाईकांविरोधात तक्रार करणाऱ्या रमेश अय्यर यांच्यावर गुन्हा दाखल, ईडी आणि मुंबई पोलिसांमध्ये सामना?
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:03 AM

मुंबई : ईडीकडून तपास केला जात असलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश अय्यर यांच्यावर टॉप्स सिक्युरिटीमध्ये आर्थिक फसवणुकी संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश अय्यर यांच्या तक्रारीमुळेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. मात्र, आता मुंबई पोलिसांनी अय्यर यांच्यावरच गुन्हा दाखल केल्याने मुंबई पोलीस विरुद्ध ईडी असा सामना होण्याची शक्यता आहे (Mumbai Police Charge sheet against Ramesh Iyer)

टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केला ज्यामुळे टॉप्स कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप नंदा यांनी केला. दरम्यान, रमेश अय्यर तीच व्यक्ती आहे ज्यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार असून त्यांचा मित्र अमित चांदोळेला अटक झाली (Mumbai Police Charge sheet against Ramesh Iyer).

टॉप्स सेक्युरिटी घोटाळ्या बाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने धाडी टाकल्या होत्या. यापैकी तीन धाडी प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित होत्या. त्याचदिवशी प्रताप सरनाईक यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगतीले होते. मात्र, आपण बाहेर गावाहून आलो आहोत. आपण क्वारंटाईन आहोत, असे सांगत सरनाईक यांनी चौकशी टाळली होती.

क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असे सरनाईक यांनी म्हटले होते. मात्र, क्वारंटाईनचा कालवाधी उलटून गेल्यानंतरी ते ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. आतापर्यंत त्यांची चौकशी होणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही घडले नाही.  त्यांनी ईडीला पत्र पाठवून तीन दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, त्यांना आता कोणतीही मुदत मिळणार नाही. उलट समन्स बजावले जाणार असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या:

अमित चांदोलेच्या कोठडीसाठी ईडी हायकोर्टात, प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ

घोटाळेबाज प्रताप सरनाईकांचं ठाकरे सरकार संरक्षण करतंय, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.