प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली तीन दिवसांची मुदत

क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असे सरनाईक यांनी म्हटले होते. मात्र, क्वारंटाईनचा कालवाधी उलटून गेल्यानंतरी ते 'ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. | pratap sarnaik

प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी 'ईडी'कडे मागितली तीन दिवसांची मुदत
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 8:42 PM

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सक्तवसुली संचनलनालायच्या (ED) चौकशीला हजर राहण्यासाठी अधिकाऱ्याकडे वेळ मागितली आहे. तस पत्र त्यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, ईडी त्यांना वेळ देणार नसल्याचे समजते. ईडी त्यांना चौकशीसाठी तात्काळ हजर राहण्याबाबत समन्स बजावणार असल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ( ED may issue summons to Shiv Sena MLA pratap sarnaik)

आमदार प्रताप सरनाईक हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असे म्हटले जात होते. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत त्यांना हजर रहायचे होत. मात्र,ते आज ही आलेच नाहीत.प्रताप सरनाईक हे ईडीच्या अधिकाऱ्यांना गेल्या नऊ दिवसापासून चकवा देत आहेत.

टॉप्स सेक्युरिटी घोटाळ्या बाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने धाडी टाकल्या होत्या. यापैकी तीन धाडी प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित होत्या. त्याचदिवशी प्रताप सरनाईक याना दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगतील होते. मात्र, आपण बाहेर गावाहून आलो आहोत. आपण क्वारंटाईन आहोत, असे सांगत सरनाईक यांनी चौकशी टाळली होती.

क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असे सरनाईक यांनी म्हटले होते. मात्र, क्वारंटाईनचा कालवाधी उलटून गेल्यानंतरी ते ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. काल किंवा आज त्यांची चौकशी होणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही घडले नाही.  मात्र,आज अचानक पत्र पाठवून तीन दिवसांचा वेळ मागितला. मात्र, त्यांना आता कोणतीही मुदत मिळणार नाही.उलट समन्स बजावले जाणार असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

आमदार प्रताप सरनाईक यांचा मित्र, भागीदार अमित चांदोले याला ‘ईडी’ने अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला आणि प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक यांची ईडीला समोरासमोर चौकशी करायची आहे. यासाठी ईडीला चांदोले याची ईडी कोडठी हवी आहे. या कोठडीसाठी ईडीने मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज दोन्ही बाजूने सुनावणी झाली. हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. कोर्ट एक दोन दिवसात आपला निकाल देण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

अमित चांदोलेच्या कोठडीसाठी ईडी हायकोर्टात, प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ

घोटाळेबाज प्रताप सरनाईकांचं ठाकरे सरकार संरक्षण करतंय, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

( ED may issue summons to Shiv Sena MLA pratap sarnaik)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.