AIIMS चे रिपोर्ट ते फेक अकाऊंटचा पर्दाफाश, सुशांत प्रकरणाची ABCD, परमबीर सिंह एक्स्क्लुझिव्ह

सुशांत सिंह प्रकरणात काही लोकांना आमच्या तपासात अडथळे आणायचे होते. लोकांमध्ये असणारा मुंबई पोलिसांविषयीचा विश्वास त्यांना संपवायचा होता.

AIIMS चे रिपोर्ट ते फेक अकाऊंटचा पर्दाफाश, सुशांत प्रकरणाची ABCD, परमबीर सिंह एक्स्क्लुझिव्ह

मुंबई: सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करायचा डाव काही लोकांनी आखला होता, असे वक्तव्य मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सुशांत सिंह प्रकरणात काही लोकांना आमच्या तपासात अडथळे आणायचे होते. लोकांमध्ये असणारा मुंबई पोलिसांविषयीचा विश्वास त्यांना संपवायचा होता. त्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. पोलीस दलाविषयी अपशब्द वापरण्यात आले. मात्र, आमचा स्वत:च्या तपासावर पूर्ण विश्वास होता, असे परमबीर सिंह यांनी सांगितले. (Mumbai Police Commissioner Parambir singh on Sushant Case)

आम्ही १४ जूनला सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु केला. सुरुवातीला आम्ही तात्काळ एडिआर दाखल केला. यानंतर सुशांत सिंह राजपूत याचे वडील तीन बहिणी, मेव्हण्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले. त्यांनी ही सुशांतने आत्महत्या केली आहे, असेच सांगितले. सुशांत सिंग यांने आत्महत्या केली त्याबद्दल कुणालाही शंका नव्हती. ना कुणाची तक्रार होती.त्यानंतर ३५-४० दिवसांनी सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहारमध्ये दुसरा गुन्हा दाखल केला.

यावेळी त्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा आरोप केला नव्हता. पण सुशांतवर जाणीवपूर्वक चुकीचे उपचार करण्यात आले. त्याच्या अकाऊंटमधून पैसे चोरण्यासाठी हे केले जात असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. यानंतर बिहार पोलीस मुंबईत आले. त्यांना येथे तपास करण्याचा अधिकार नव्हता. कोणत्याही न्यायालयाचे आदेश नव्हते. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे केस सोपवल्यानंतर आम्ही सर्व कागदपत्रे सुप्रीम कोर्टाला दिली. त्यापूर्वी आम्ही सुप्रीम कोर्टात आमच्या तपासाबाबत एक बंद लिफाफा सादर केला होता. ही कागदपत्रे पाहिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालपत्रात आमचा तपास योग्य असल्याचा निर्वाळा दिल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले.

याशिवाय, सीबीआयला सुपूर्द करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कूपर रुग्णालयातील सुशांतच्या पोस्टमॉर्टम अहवालाचाही समावेश होता. आता ‘एम्स’चा अहवालही आला आहे. त्यामध्ये कूपर रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल योग्य असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे, याकडेही परमबीर सिंह यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी वापरलेल्या फेक अकाऊंटप्रकरणी गुन्हा दाखल’ मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर हजारोंच्या संख्येने फेक अकाऊंट तयार करण्यात आले. त्याचा वापर मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी झाला. हे सर्व फेक अकाउंट होते त्याचं आम्ही ओळख पटवली. त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या सायबर क्राईम सेलचे अधिकारी याचा तपास करत आहेत. याप्रकरणात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यामागे कोण आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिला.

संबंधित बातम्या:

“ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी”

सुशांतची पवना, मुंबईतील प्रॉपर्टी हडपण्याचा कुटुंबाचा डाव होता का?; शिवसेनेकडून चौकशीची मागणी

(Mumbai Police Commissioner Parambir singh on Sushant Case)

Published On - 2:17 pm, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI