कफ सिरपमध्ये अंमली पदार्थ मिसळून विक्री करणाऱ्याला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने एक मोठी आणि वेगळी कारवाई केली आहे. (Mumbai Police Seized Drugs) 

कफ सिरपमध्ये अंमली पदार्थ मिसळून विक्री करणाऱ्याला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने एक मोठी आणि वेगळी कारवाई केली आहे. कफ सिरपमध्ये अंमली पदार्थ मिसळून त्याची विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ अब्दुल सत्तार असे अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला कामाठीपुरात परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून औषधमिश्रित सुमारे 25 लाख रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. (Mumbai Police Seized Drugs)

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाच्या घाटकोपर युनिटच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार आणि त्याच्या पथकाला औषधात ड्रग्स मिसळून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्रँट रोड येथील पिला हाऊस भागातून औषध मिश्रित ड्रग्सची विक्री करणाऱ्या एकाला अटक केली.

आसिफ अब्दुल लाकडीया उर्फ आसिफ टकल्या असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यावेळी त्याच्याकडे ड्रग्समिश्रित 80 बाटल्या सापडल्या. चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तीन ठिकाणी धाडी टाकल्या.

पोलिसांनी ग्रँट रोड येथील ओरियंट शॉपिंग कॉम्प्लेक्स येथून 25 बॉक्स असलेल्या 10 गोण्या जप्त केल्या आहेत. तर पायधुनी, धोबी घाट येथून 34 बॉक्स असलेल्या 12 गोण्या जप्त केल्या. अशा एकूण 59 बॉक्समध्ये असलेल्या 7120 बॉटल जप्त केल्या आहेत. या बॉटलमध्ये कोरेन फॉस्फेट हा अंमली पदार्थ होता. याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. (Mumbai Police Seized Drugs)

संबंधित बातम्या : 

मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींचे अमली पदार्थ जप्त

हेड कॉन्स्टेबल महिलेचा मृतदेह 20 दिवस घरातच, आत्मा आला का परत? भयंकर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI