Mumbai Rains | चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल

मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Rains | चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल
Aaditya Thackeray reaches Chembur
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 12:48 PM

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा आढावा घेतला.

आदित्य ठाकरेंकडून आढावा

मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 17 जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान तसेच इतर स्थानिकांशी संवाद साधला. तसेच ही दुर्घटना कशी घडली याचीही माहितीही घेतली.

नेमक काय घडलं? 

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळ चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे  एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.  यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या दुर्घटनेत अद्याप 6 ते 8 जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी वेगाने बचावकार्य सुरु आहे. मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

(Aaditya Thackeray reaches Chembur Bharat Nagar area wall collapse)

संबंधित बातम्या : 

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.