AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains IMD Updates : अवघ्या 10 मिनिटात कांदिवली जलमय, मुंबईसह ‘या’ 9 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rains IMD Monsoon Updates : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिपर सुरू आहे. उपनगरात तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कांदिवलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या दहा मिनिटात रस्ते जलमय झाले आहेत.

Maharashtra Rains IMD Updates : अवघ्या 10 मिनिटात कांदिवली जलमय, मुंबईसह 'या' 9 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज
kandivali rainImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2023 | 11:08 AM
Share

सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. कांदिवलीत तर आज अवघ्या दहा मिनिटाच्या पावसाने संपूर्ण परिसरात पाणी तुंबले आहे. तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे आंबेनळी घाटात रात्री आणि पहाटे दोन वेळा दरड कोसळली आहे. त्यामुळे हा मार्गच प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसा अलर्टही जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना जपून राहावे लागणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यातील नऊ जिल्ह्यात मान्सून प्रचंड सक्रिय राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर आदी जिल्ह्यात येते काही दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे या भागातील अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काही भागात झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने झाडांखाली न थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अवघ्या दहा मिनिटात पाणी तुंबले

दरम्यान, रात्रभर रिपरिप सुरू असलेल्या पावसाने आता मुंबईतसह उपनगरात जोर धरला आहे. अवघ्या 10 मिनिटांच्या मुसळधार पावसामुळे कांदिवली जलमय झाली आहे. गेल्या 10 मिनिटांच्या मुसळधार पावसाने कांदिवलीतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पाण्याने भरलेले हे चित्र कोणत्याही नदीचे नसून कांदिवलीच्या लालजी पाड्यात असलेल्या इंदिरा नगर येथील आहे. या इंदिरानगरातून कांदिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हे पाणी भरले आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो लोक व शाळकरी मुले ये-जा करत असतात.

पालिकेची पोलखोल

जेव्हा जेव्हा कांदिवलीच्या लालजीपाडा, इंदिरानगर परिसरात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पावसाचे आणि गटारीचे पाणी या भागात साचते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप येतं. आताही अवघ्या दहा मिनिटाच्या पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावर साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून लोकांना ये-जा करावी लागत आहे. नाल्याच्या आणि शौचालयाच्या या पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची भीती असल्याने नागरिक धस्तावले आहेत. महापालिका प्रत्येक पावसाळ्यात नालेसफाई झाल्याचा दावा करत असते. मात्र, लालजी पाड्यातील आजच्या परिस्थितीमुळे महापालिकेची पोलखोल झाली आहे.

अंधेरीत पाणी भरण्याची शक्यता

मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे. कांदिवली आणि मालाड भागात मुसळधार पाऊस पडतानाच मध्येच काळेकुट्ट ढगही जमा होत आहेत. कांदिवलीप्रमाणेत इतर भागात पावसाचा जोर वाढल्यास अंधेरी, मालाड भुयारी मार्गासह सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

पाणी साचण्याची भीती

मीरा भाईंदर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच मीरा भाईंदर शहरात ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला. मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर येथील सखल भागात पाणी साचाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?