AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसूती वेदना, तरुणाचा डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल अन्… मध्यरात्री राम मंदिर स्थानकात घुमला बाळाचा आवाज

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली.

मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसूती वेदना, तरुणाचा डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल अन्... मध्यरात्री राम मंदिर स्थानकात घुमला बाळाचा आवाज
| Updated on: Oct 16, 2025 | 8:26 AM
Share

आपल्यापैकी अनेकांनी 3 इडियट्स हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसूती वेदना सुरु होतात. त्या दिवशी शहरात खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसते. यावेळी रँचो हा चित्रपटातील नायक हा डॉक्टर असलेल्या अभिनेत्रीसोबत व्हिडीओ कॉलद्वारे बोलून तिची प्रसूती करतो. असाच काहीसा प्रसंग मुंबईत घडला. धावती लोकल ट्रेन, गर्भवती महिलेला अचानक सुरु झालेल्या प्रसूती वेदना आणि मदतीसाठी कोणी नसताना धाडसी तरुणाने दाखवलेली हिंमत यामुळे एक गोंडस बाळ जन्माला आले आहे. मुंबईतील राम मंदिर या रेल्वे स्थानकात ही घटना घडली.

नेमंक काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली.

यावेळी महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. तिचे बाळ अर्धे बाहेर, अर्धे आत अशा नाजूक स्थितीत अडकले होते. तसेच राम मंदिर या स्थानकावर तातडीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता. हा प्रसंग पाहून विकास बेद्रे यांनी जराही वेळ न घालवता तातडीने त्याची मैत्रिण असलेल्या डॉ. देविका देशमुख यांना व्हिडीओ कॉल केला.

अन् मध्यरात्री राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला

डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.

या अत्यंत तणावपूर्ण क्षणी विकास बेद्रे यांनी अफाट धैर्य आणि समयसूचकता दाखवली. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांना अखेर यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लगाला. त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म सुखरूप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे.

हिंमतीचे सर्वत्र प्रचंड कौतुक

दरम्यान विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेमुळे दोन जीव वाचले. या घटनेनंतर रिअल लाईफ हिरो असलेल्या विकास बेद्रे यांच्या हिंमतीचे सर्वत्र प्रचंड कौतुक होत आहे. त्यांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण त्यांना देव माणूस असेही बोलताना दिसत आहेत.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.