स्पिरीट ऑफ मुंबईकर, झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर; कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?

मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डपैकी 18 वॉर्डमध्ये एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Slum Area Corona Free after BMC various Measures) 

स्पिरीट ऑफ मुंबईकर, झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर; कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?
Corona Mumbai
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 7:42 AM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मुंबईतल अनेक झोपडपट्ट्यांनी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डपैकी 18 वॉर्डमध्ये एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Slum Area Corona Free after BMC various Measures)

मुंबईतील झोपडपट्ट्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल 

मुंबईत सद्यस्थितीत पालिकेच्या 24 वॉर्डपैकी 18 वॉर्डमध्ये आता एकही कंटेनमेंट झोन नाही. तर एका वॉर्डमध्ये एक, दोन वॉर्डमध्ये 2, एका वॉर्डमध्ये 3 अशा सहा प्रभागांत फक्त 22 प्रतिबंधित क्षेत्रे शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी भागाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. मुंबईतील सहा वॉर्डमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके कंटेनमेंट झोन शिल्लक आहेत.

मुंबईतील कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?

के/पूर्व – अंधेरी पूर्व – 8 आर/दक्षिण – कांदिवली – 6 एस – भांडूप – 3, टी – मुलुंड – 2 एम/पश्चिम – चेंबूर – 2 ई – भायखळा – 1

मुंबईतील इतर भागात किती कंटेनमेंट झोन?

तर दुसरीकडे कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये पालिकेसाठी आव्हान ठरलेल्या उत्तर मुंबईतील आर/मध्य बोरिवली, आर/उत्तर दहिसर, पी/दक्षिण गोरेगाव, पी/उत्तर मालाड, के/पश्चिम अंधेरी पश्चिम विभागातील झोपडपट्टय़ांमध्ये आता एकही कंटेनमेंट झोन उरलेला नाही.

याशिवाय ए वॉर्ड, बी डोंगरी, सी चिराबाजार, काळबादेवी, डी ग्रँटरोड, एफ उत्तर शीव-वडाळा, पिंग सर्कल, एफ दक्षिण परळ, एल्फिन्स्टन, जी/उत्तर धारावी, दादर, माहीम, एच पूर्व वांद्रे पूर्व, एच/पश्चिम वांद्रे पश्चिम, एल कुर्ला, एन घाटकोपर या वॉर्डमधील झोपडपट्टय़ांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याची कारण काय?

मुंबईत गेल्या मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीसह कुर्ला, वरळी कोळीवाडे, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी, वांद्रय़ाच्या झोपडपट्टी भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागात ‘कोरोना हॉटस्पॉट’ निर्माण झाला होता. त्यामुळे हा संसर्ग कसा रोखायचा असा सवाल पालिकेसमोर निर्माण झाला होता.

मात्र पालिकेने ‘मिशन झिरो’सह ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आला. घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, सॅनिटायझर, जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावी काम केल्यामुळे झोपडपट्टीतील कोरोना वेगाने नियंत्रणात आला. (Mumbai Slum Area Corona Free after BMC various Measures)

संबंधित बातम्या : 

ही मुंबई आहे मुंबई! शौचालय नेमकं कुणाचं? एक नाही दोन नाही तीन पक्षांचं भांडण, नेत्यांचे दौरे

जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, धारावी सातव्यांदा शून्यावर, महापालिकेने करुन दाखवलं!

Maharashtra 5 level Unlock: अनलॉकच्या 5 लेव्हलमध्ये तुमच्या जिल्हा आणि महानगरपालिकेची स्थिती काय? रेड झोनमध्ये कोणते जिल्हे?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.