मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक, अमेरिकत नोकरी लावण्याच्या अमिषाने अनेक मुलींवर अत्याचार

हा धक्कादायक प्रकार संशयिताने अनेक मुलींसोबत केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून संशयिताला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक, अमेरिकत नोकरी लावण्याच्या अमिषाने अनेक मुलींवर अत्याचार

मुंबई : मुंबई पोलिसांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला ताब्यात घेतलं आहे. परदेशात नोकरी देतो असं खोटं आश्वासन देऊन अल्पवयीन मुलींचं शारीरिक शोषण करत असल्याच्या आरोपाखाली एकाला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार संशयिताने अनेक मुलींसोबत केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून संशयिताला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai software engineer Arrested on rape charges)

मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय संशयित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून उरूज अहमद सिद्दिकी असं त्याचं नाव आहे. उरूज हा मालाड पूर्वच्या संजय नगर इथला रहिवासी आहे. तो अनेक मुलींना परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्यांना खोटं बोलून आपल्या घरी बोलवायचा आणि फोटो घेण्याच्या नावाखाली त्यांचा अश्लील फोटो किंवा व्हीडिओ बनवायचा. यानंतर ब्लॅकमेल करून मुलींचं लैंगिक शोषण करायचा.

सर्वसामान्यांना झटका बसण्याची चिन्हं, पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली

संशयित हा अमेरिकेत नोकरी लावायच्या व्यवसायात होता. वर्ष 2016 मध्ये आपल्या शेजारच्या एका मुलीला अमेरिकेत नोकरी लावतो असं खोटं सांगून तिला त्याने घरी बोलवलं. यावेळी तिचे मुलीचा अश्लील फोटो काढून त्याने तिला ब्लॅकमेल करत तब्बल साडे तीन वर्ष बलात्कार केला.
यावेळी 2020 मध्ये मुलीने पोलिसांत जाण्याची धमकी दिली असता त्याने मुलीसोबत लग्न केलं आणि तिला धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडलं. यानंतर पीडितेला तो मध्य प्रदेशमध्ये घेऊन गेला. पण त्याच्या अत्याचाराला कंटाळून मुलगी पळून आली आणि 22 ऑक्टोबर 2020 रोजी तिने मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर 25 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी नराधमाला अटक केली.

Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या…

दरम्यान, पोलिसांनी कलम 376, 328, 323, 506 सोबतच पॉक्सो कायद्याअंतर्गत 4, 6, 10 अंतर्गत गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशवरून अटक करून मुंबईत आणलं आहे. पोलीस सध्या संशयिताची चौकशी करत असून त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची कुबूली घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकरणात त्याने आणखी किती मुलींना फसवलं याचाही पोलीस शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

(Mumbai software engineer Arrested on rape charges)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI