VIDEO : ‘या’ बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय, संजय राऊतांची मागणी

एका ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mumbai traffic Police Beaten and abused By women video viral)

VIDEO : 'या' बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय, संजय राऊतांची मागणी

मुंबई : मुंबईत एका ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई केलेल्या हवालदाराला एका महिलेने बेदम चोप दिला आहे. या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा ही महिला करत आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संबंधित महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. (Mumbai traffic Police Beaten and abused By women video viral)

या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, हा मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.

नेमकं प्रकरणं काय? 

मुंबईतील काळबादेवी परिसरात ट्रॅफिक हवालदाराने एका महिलेने वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या व्हिडीओत महिला  आणि तिच्या साथीदाराकडून वारंवार शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आहे.  त्यानंतर त्या महिलेने या व्हिडीओत हवालदाराची कॉलर पकडत मारहाण केली. तसेच त्या हवालदाराचे कपडेही फाडले. या व्हिडीओत ती महिला त्या हवालदाराला शिवीगाळ करताना दिसत आहे.

याप्रकरणी L. T. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  करण्यात आला आहे. या आरोपींवर कलम 571/2020 IPC 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.(Mumbai traffic Police Beaten and abused By women video viral)

संबंधित बातम्या :

मुंबईतील टीबी रुग्णालयाचा भोंगळ कारभार; कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बाथरुममध्ये सापडल्यानं खळबळ

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

Published On - 1:29 pm, Sat, 24 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI