मुंबईतील टीबी रुग्णालयाचा भोंगळ कारभार; कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बाथरुममध्ये सापडल्यानं खळबळ

पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना 18 ऑक्टोबरला त्याचा मृतदेह हा बाथरुममध्ये सापडला. (Mumbai TB Hospital Patient dead body found in Bathroom)

मुंबईतील टीबी रुग्णालयाचा भोंगळ कारभार; कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बाथरुममध्ये सापडल्यानं खळबळ

मुंबई : मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टी. बी रुग्णालयातून बेपत्ता असलेल्या एका रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्येच सापडला आहे. सूर्यभान तेजबहादूर यादव (27) असे या रुग्णाचे नाव आहे. तो आरे कॉलनी परिसरात राहतो. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. (Mumbai TB Hospital Patient dead body found in Bathroom)

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यभान यादव याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला टीबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 4 ऑक्टोबरपासून तो बेपत्ता होता. त्याची कोणतीही माहितीही न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती.

त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना 18 ऑक्टोबरला त्याचा मृतदेह हा बाथरुममध्ये सापडला. जवळपास 14 दिवसांपासून त्याचा मृतदेह हा बाथरुममध्येच पडून होता. मात्र तरीही याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान सूर्यभानचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने त्याचा मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही, असे सांगितले जात आहे. मात्र या प्रकारामुळे रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सूर्यभान यादव यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. (Mumbai TB Hospital Patient dead body found in Bathroom)

संबंधित बातम्या :  

पालिकेचा दणका! खासगी रुग्णालयांनी 14 कोटी रुपये रुग्णांना दिले परत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *